लग्नाच्या काही दिवसांमध्येच सिद्धार्थ-मिताली या मराठमोळ्या जोडीने शेअर केली ‘गुडन्यूज’

लग्नाच्या काही दिवसांमध्येच सिद्धार्थ-मिताली या मराठमोळ्या जोडीने शेअर केली ‘गुडन्यूज’

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेता व अभिनेत्री आहेत. ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. आपले अनेक फोटो शेअर करत असतात. सिद्धार्थ चांदेकर याने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केलेले आहे. तसेच अनेक नाटकांमध्ये देखील ते काम करत असतात.

2021 मध्ये या दोघांनी पुण्यातील ढेपे वाडा येथे शानदार सोहळ्यात लग्न केले आहे. हे दोघेही सोशल मीडियावर आपले अनेक फोटो टाकत असतात. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने मिताली बाबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो मित्रांसोबत खेळताना दिसत आहे. तसेच त्याची कुत्री देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सिद्धार्थ चांदेकर याने काही वर्षांपूर्वी अवधूत गुप्ते यांच्या झेंडा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनय केला होता. त्याचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये त्याची भूमिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर त्याला अनेक मालिकांच्या ऑफर देखील मिळाल्या. सिद्धार्थ चांदेकर याने क्लासमेंट या चित्रपटात काम केले होते हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

त्यानंतर पिंडदान, बालगंधर्व, सतरंगी रे, वजनदार, ऑनलाइन बिनलाइन, लास्ट अँड फाउंड या चित्रपटात त्यांनी काम केले, तर मिताली हिने उर्फी या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पाऊल टाकले होते. झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेतही काम केले. तिची ही मालिका प्रचंड गाजली होती.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ याने एक व्हिडिओ शेअर करून ज्या बेडमध्ये मिताली झोपली होती, तेथील त्याने व्हिडिओ तयार केला होता.मिताली हिने चादर ओढल्यानंतर त्याची कुत्री या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिचे नाव डोरा असे आहे. डोरा हिचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो.

डोरा हिला आईस्क्रीम खूप आवडते, असे देखील त्याने सांगितले होते, तर आता सोशल मिडीयावर सिद्धार्थ याने मिताली यांनी एक गुड न्यूज दिली आहे. आपल्याला असे वाटत असेल की, या दोघांना बाळ होणार आहे का? मात्र असे काही झाले नसून या दोघांनी नुकतेच मुंबईत घर खरेदी केल आहे. त्यांचे हे मुंबईतील पहिले घर असल्याचे सांगण्यात येते.

मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतं की, त्याचं स्वतःचं घर या स्वप्न नगरीमध्ये असल पाहिजे, असे या दोघांनी या पोस्टमध्ये म्हटल आहे. हे आमचं स्वप्न आज पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर आपल्याला ही जोडी आवडते का? आम्हाला माहिती द्या.

Team Hou De Viral