बॉलिवूड मधून दुःखद बातमी ! प्रसिद्ध गायकाचा झाला मोठा अपघात, प्रकृती गंभीर ?, बरगड्या…

बॉलिवूड मधून दुःखद बातमी ! प्रसिद्ध गायकाचा झाला मोठा अपघात, प्रकृती गंभीर ?, बरगड्या…

गेल्या काही दिवसापासून गायक तसेच कलाकार यांच्या येत असलेल्या दुःखद बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांवर दुःखांचा डोंगर कोसळत आहे या दुःखद बातम्या एकापाठोपाठ एक येतच आहेत. आता ही एक अशीच बातमी बॉलीवूड मधून आली आहे.

बॉलिवूडमध्ये आज अनेक प्रसिद्ध गायक दिसतात, यामध्येच एक चर्चेत असलेले नाव म्हणजे जुबिन नौटियाल. जुबिनने बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी आवाजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, आता जुबिनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल याचा अपघात झाला आहे.

गुरुवारी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी जुबिन पायऱ्यांवरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या कोपऱ्याला गंभीर इजा झाली. याव्यतिरिक्त त्याच्या पायावर, बरगड्यांवर आणि डोक्यावरही मार लागला आहे . जुबिनला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जुबिनच्या या गंभीर दुखापती बद्दल कळतात त्याचे चाहता वर्ग तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

सिनेसृष्टीत खूप परिश्रम करत आपले नाव कमावणारा म्हणून जुबिन नौटीयालला ओळखले जाते. सुरुवातीला नकार सहन करणाऱ्या जुबिनने खूप मेहनतीने नाव कमावले आहे. त्याचा आवाज चाहत्यांना खूपच भावतो. जुबीन आपल्या आवाजाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. त्याने गायलेली गाणी सुपरहिट ठरली आहेत.

त्यामध्ये ‘राता लंबिया’, ‘लुट गये’, ‘हमनवा मेरे’, ‘तुझे कितना चाहने लगे हम’, ‘तुम ही आना’ आणि ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ यांसारख्या बऱ्याच गाण्यांचा समावेश आहे. गायक जुबिन नौटियाल याचे एकनवीन गाणे ‘तू सामने’ हे रिलीज झाले आहे. या गाण्यासाठी त्याच्यासोबत गायिका योहानी हिनेदेखील आपला आवाज दिला आहे.

गुरुवारीच जुबिन आणि योहानी यांना या गाण्याच्या लाँचवेळी स्पॉट करण्यात आले होते. यानंतर त्याला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला आपल्या उजव्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल असे बोलले जात आहे. त्याला डॉक्टरांनी आपल्या उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

Team Hou De Viral