मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही वेळात ‘या’ मराठी अभिनेत्रीचे झाले होते दुःखद निधन

मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही वेळात ‘या’ मराठी अभिनेत्रीचे झाले होते दुःखद निधन

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत की, ज्यांनी सर्वत्र आपल्या नावाचा डंका वाजवला. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील या होत.त्यांच्या मृत्यूनंतरही परदेशातही त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. कारण त्यांनी काम केलेले चित्रपट जगभरात गाजत होते.

त्यांनी अमिताभ सोबत काम केलेले सगळे चित्रपट हिट राहिलेले आहेत. स्मिता पाटील एक मराठी घरातून आलेली अभिनेत्री होत्या. रंग काळा सावळा असला तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी सगळ्यांनाच आपलेसे केले होते. मराठी मध्ये त्यांनी जैत रे जैत नावाचा चित्रपट केला होता. या चित्रपटात मोहन आगाशे यांची देखील भूमिका होती.

या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय ठरली होती. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. लता मंगेशकर यांच्या आवाजातील सगळेच गाणे या चित्रपटात प्रचंड गाजले होते. अफाट लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटानंतर स्मिता पाटील यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्यांबद्दल माहिती घेणार आहोत की, त्यांनी स्मिता पाटील यांना सावध राहण्याचा इशारा त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षे आधी दिला होता. या अभिनेत्याचे नाव अन्नू कपूर असे आहे. अन्नू कपूर यांनी याआधी अनेक चित्रपटात काम केले आहे. चित्रपटांमधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

त्यांनी सनी देओल, अनिल कपूर यांच्यासह इतर कलाकारांबरोबर त्यांनी लोकप्रिय अशा भूमिका केल्या. छोट्या पडद्यावर देखील ते करत असलेले अनेक‌ शो प्रचंड गाजले आहेत. काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील आणि अन्नू कपूर विमानामध्ये एकत्र प्रवास करत होते. अन्नू कपूर यांना भविष्य पाहता येते. अनेकांचे भविष्य ते पाहत असतात.

विमान प्रवास करत असताना स्मिता पाटील यांना अन्नू कपूर यांनी भविष्य सांगितले होते की, भविष्यामध्ये तू सांभाळून राहा. तुला मोठा धोका होऊ शकतो, असे त्यांनी आधीच सांगितले होते आणि काही वर्षातच स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला होता. ही आठवण नुकतीच सोशल मीडियावर शेअर झाली आहे. त्यामुळे याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्मिता पाटील यांनी रुपेरी पडदा गाजवून सोडला होता. काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील यांचे निधन झाले होते. स्मिता पाटील या शिवाजीराव पाटील यांच्या कन्या होत. शिवाजीराव पाटील हे आमदार होते. तसेच स्मिता पाटील यांची आई विद्याताई पाटील यादेखील समाजसुधारक होत्या.

स्मिता पाटील या ज्यावेळेस मृत्युमुखी पडल्या. त्यावेळी त्यांचे वय केवळ 31 वर्षाचे होते. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलाचे नाव प्रतीक बब्बर असे आहे. प्रतीक बब्बर याला आपल्या आईचे तोंड देखील पाहता आले नाही. स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्याबरोबर लग्न केले होते. मात्र, अवघ्या काही वर्षात‌ त्यांना आजाराची लागण झाली आणि त्यानंतर त्यांनी हे जग सोडले.

आता प्रतीक बब्बर याने आपल्या आईला आठवताना अनेक आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत, तर आपल्याला स्मिता पाटील आवडत होत्या का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral