यांच्यात काहीतरी शिजतंय ! जय पडलाय या स्पर्धकाच्या प्रेमात ? रात्ररात्र जागून करताय…

यांच्यात काहीतरी शिजतंय ! जय पडलाय या स्पर्धकाच्या प्रेमात ? रात्ररात्र जागून करताय…

कलर्स मराठी वरील बिग बॉसमध्ये सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. अनेक स्पर्धक एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाने हे काही भागांमध्ये मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत होते. मात्र, आता जय याचे एका अभिनेत्रीसोबत सूत जुळलयची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

गेल्या भागामध्ये आपण सुरेखा कुडची आणि स्नेहा वाघ यांना झोपाळ्यावर बसून गोसिप करताना पाहिले होते. स्नेहा वाघ ही मनमोकळेपणाने सुरेखाताई यांच्यासोबत चर्चा करताना दिसली. माझ्या आयुष्यामध्ये फार खडतर प्रसंग आले आणि आता या बिग बॉसच्या घरात मध्ये तो पुन्हा आलेला आहे, असे सांगत तिने अविष्कार दारव्हेकर याच्या बद्दल आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

ज्यावेळेस मी रात्री झोपायचे त्यावेळेस मला अंगात ताप यायचा. तरीदेखील तो मला अजिबात विचारायचा नाही. तो मला मारायचा. माझे गाल लाल करायचा. हा त्रास मी खूप दिवस सहन केला. केवळ 17 वर्षांचे वय असल्याने त्या वेळेस मी घाबरत होते. मात्र, आता माझे वय जास्त आहे. त्यामुळे मला आता आत्मविश्वास आला आहे.

त्यामुळे मी त्याच्याकडे पुन्हा कधीच जाऊ शकत नाही, असेही ती म्हणाली. त्यावर सुरेखा ताई यांनी सांगितले की, तुला जो टी-शर्ट गिफ्ट दिलेला आहे, तो आविष्कार यांनी दिलेला आहे. मात्र, त्याने मला सांगितले होते की, हा सगळ्यातर्फे टी शर्ट दिला आहे, असे तिला सांगतिले तर दुसरीकडे आविष्कार देखील उत्कर्ष याच्यासोबत चर्चा करताना स्नेहा बद्दल बोलत असतो आणि माझ्या सगळे डोक्यात गेले.

आता अशा शिव्या आता मनात येत आहेत. ज्या मी इथे त्या देऊ शकत नाही. तर दुसरीकडे मीरा जगन्नाथ देखील आता सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वाघांना दिसत आहे. बिग बॉस महेश मांजरेकर यांनी चावडीवर तिला समजावून सांगितले. त्यानंतर तिचामध्ये आता बदल होत आहेत, तर आता या शोमध्ये कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील हीदेखील बाहेर पडल्यात जमा आहे.

कारण तिने याबाबतचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. यामध्ये बोलताना शिवलीला म्हणाली की, मी आता हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मी वैद्यकीय उपचार घेतले. मात्र, तरीही माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे मी आता माझ्या खुल्या वातावरणात पुन्हा एकदा जाणार आहे.

सर्वांची माफी मागते, असे तिने म्हटले आहे. तर दुसरीकडे भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई देखील या शोमध्ये वादग्रस्त होताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये प्रेमाचे वारे देखील वाहताना दिसत आहेत. कारण जय दुधाने आणि स्नेहा वाघ यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचे दिसत आहे.

रात्री तीन वाजता दोघेही बेडवर एकमेकांना गप्पा मारताना दिसत आहेत. त्यानंतर स्नेहा हिचा वाढदिवस असताना जय यांनी तिला अजिबात काम करू दिले नाही. त्याचप्रमाणे किचन मध्ये देखील काम करू लागला.स्नेहा भांडी घासत होती. त्यावेळेस तिला त्याने बाहेर काढले. जय दुधाने याला हसून खेळून प्रतिसाद देत आहे.

त्याचप्रमाणे मला बॉडी असलेले नाहीतर बुद्धी असलेले लोक आवडतात, असे म्हणून तिने त्याला टोमणा मारला. त्यामुळे आता एकंदरितच जय दुधाने आणि स्नेहा यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा आहे.

Team Hou De Viral