BBM3 ! हिला ‘बिगबॉस’ च्या घरातून बाहेर काढा, स्नेहा वाघ वर प्रेक्षक भडकले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे

BBM3 ! हिला ‘बिगबॉस’ च्या घरातून बाहेर काढा, स्नेहा वाघ वर प्रेक्षक भडकले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे

बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यानंतर स्नेहा वाघ ही सगळ्यांच्याच हिटलिस्टवर असल्याचे सध्या दिसत आहे. कारण स्नेहा वाघ ही शोमध्ये सहभागी झाल्यापासून वेगवेगळे टास्क देखील पूर्ण करताना दिसत नाही. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून ती चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे स्नेहा वाघ हिचा घटस्फोटित पती अविष्कार दारव्हेकर देखील हा या शोमध्ये सहभागी झाला आहे.

नऊ वर्षे या दोघांनी एकत्र संसार केल्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला आहे. वयाच्या सतराव्या वर्षी स्नेहा वाघ हिने आविष्कारसोबत लग्न केले होते. त्यानंतर स्नेहा वाघ हिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार देत आविष्कार याच्यापासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने अनुराग साळवी या फॅशन डिझायनर सोबत लग्न केले होते.

मात्र, त्याच्या विरोधातही तिने तक्रार दिली होती आणि त्यानंतर घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने काही हिंदी मालिकेतही काम केले. हिंदी मालिकेत काम केल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. कारण फैसल खान या अभिनेत्यासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, तिने याबाबत नकार दिला होता.

आता बिग बॉसच्या घरामध्ये देखील स्नेहा सहभागी झाल्यापासून तिचा अनेकांची वाद झाला. पहिल्याच दिवशी तिचा आणि मीरा जगन्नाथचा जेवणावरून वाद झाला होता. त्यानंतर स्नेहा देखील चांगलीच भडकली होती. सुरेखा कुडची यांच्या सोबतही स्नेहाचा चांगलाच वाद झाला किचनमध्ये असलेल्या कचर्‍यावरून त्यांचे हे भांडण झाले होते.

मात्र, सुरेखा कुडची ज्यावेळेस घराच्या बाहेर पडल्या त्यावेळेस स्नेहा ही ढसाढसा रडली होती. त्यामुळे तिला जास्त वाईट वाटत होते, असे सांगण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसापासून स्नेहा वाघला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कारण तिचे चाहते म्हणाले आहेत की, स्नेहा वाघाचे शोमध्ये अस्तित्व अजिबातच दिसत नाही. ती शोमध्ये आहे की नाही असे वाटत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ती या शोमध्ये आहे. मात्र, ती कुठलाही खेळ खेळताना दिसत नाही. त्याचबरोबर तिच्याकडे कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग अजिबात नसते.

तसेच ती कुठलेही नियम पाळत नाही आणि तिचा आता लुक देखील बदलला आहे. सुरुवातीला ती ज्या वेळेस घरात आली होती, त्यावेळेस तिचा लुक हा व्यवस्थित होता. मात्र, आता तिचा लूक बदलला आहे. तसेच जय याच्यासोबत देखील तिचे प्रेमसंबंध सुरू असल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे.

दुसरीकडे सोनाली पाटील आणि विशाल निकम यांच्यामध्ये प्रेम संबंध झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांप्रमाणेच आपले प्रेम संबंध असावे, असे स्नेहा आणि जय यांना वाटत असल्याचे ट्रॉलर्स म्हणत आहेत. तसेच सोनाली घाई घाई मध्ये काहीही निर्णय घेऊन टाकते, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

याचप्रमाणे काही जणांचे असे म्हणणे आहे की, मीरा जगन्नाथ ही आता चांगली दिसत आहे, तर सोनाली पाटील ही विचित्र दिसत आहे. त्यामुळे मीरा हिच्यापेक्षा सोनाली पाटील आता घाण दिसत आहे असे अनेकांनी म्हटले आहे.

Team Hou De Viral