‘बिगबॉस मराठी’ मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा आली एकत्र, जाणून घ्या काय आहे कारण

‘बिगबॉस मराठी’ मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा आली एकत्र, जाणून घ्या काय आहे कारण

कलर्स मराठी वर काही महिन्यापूर्वी संपलेला मराठी बिग बॉस 3 हा शो प्रचंड चर्चेत राहिला होता. कारण या शोमध्ये सहभागी झालेले कलाकार हे आपल्या दमदार खेळाने सगळ्यांमध्येच लोकप्रिय झाले होते. बिग बॉस तिसऱ्या सेशन मध्ये आपल्याला विशाल निकम हा विजेता झाल्याचे पाहायला मिळाले.

सगळ्यात शेवटी विकास पाटील, विशाल निकम आणि जय दुधाने त्रिकूट यांची जोडी फायनल मध्ये होती. त्यामध्ये विकास पाटील हा बाहेर पडला आणि नंतर जय दुधाने आणि विशाल निकम यांच्यामध्ये स्पर्धा लागली. यामध्ये जय दुधाने हा पहिला तर विशाल निकम याने या शोमध्ये बाजी मारली. त्यानंतर विशाल निकम याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.

बिग बॉसच्या शोमध्ये स्नेहा वाघ तिचा घटस्फोटीत पती आविष्कार दार्वेकर संतोष चौधरी म्हणजेच दादुस, भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई, सुरेखा कुडची, विकास पाटील, विशाल निकम, जय दुधाने, सोनाली पाटील, मिनल शहा अक्षय वाघमारे, आदिश वैद्य यांच्यासह इतर कलाकार देखील आपल्याला दिसले होते.

हा शो प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या शोमध्ये स्नेहा वाघ हिचे अनेकांसोबत भांडणे झाल्याचे आपण पाहिले, तर स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांची या शोमध्ये केमिस्ट्री देखील जुळत असल्याचे देखील दिसत होते. मात्र, या शोमध्ये अविष्कार दारव्हेकर स्नेहा वाघ हे सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कारण की या दोघांचा घटस्फोट झाला होता, असे असले तरी या दोघांनी या शोमध्ये तसे जाणवू दिले नाही. मात्र काही आठवड्याच्या खेळानंतर आविष्कार या शोमधून बाहेर पडला. त्यानंतर स्नेहा वाघ बाहेर पडली. सोनाली पाटीलही हा शो जिंकेल, असे सांगण्यात आले. मात्र, शेवटी विशाल निकम याने बाजी मारली.

आता या शोमध्ये सहभागी झालेले संतोष चौधरी, दादूस आणि स्नेहा वाघ यांच्या बाबतीतला एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र आल्याची दिसताहेत. स्नेहा वाघ आणि संतोष चौधरी यांच्यामध्ये मुलगी आणि वडिलांचे नाते होते.

याबाबत स्नेहा वाघ हिने दादुस यांना वडिलांचा दर्जा दिला होता. माझे वडील मी तुमच्यामध्ये पाहते, असे तिने म्हटले होते. त्यामुळे या दोघांचे नाते अतिशय जबरदस्त या शोमध्ये पाहायला मिळाले होते. आता बाहेर देखील या दोघांची भेट झाली आहे. या दोघांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते खूप चांगले दिसत आहेत.

अनेकांनी दोघांचे फोटो पाहून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला पाहून आम्हाला आनंद वाटला आहे, असे म्हटले आहे.

Team Hou De Viral