टीव्ही इंडस्ट्री हादरली ! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचे निधन; मृत्यूशी झुंज देताना रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास

टीव्ही इंडस्ट्री हादरली ! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचे निधन; मृत्यूशी झुंज देताना रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण अनेक कलाकार आपल्याला सोडून गेल्याचे पाहिले. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता. मात्र, आता एका बंगाली अभिनेत्रीचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे तेथील मालिका विश्वाला चांगलाच धक्का बसला आहे.

या अभिनेत्रीचे नाव सोनाली चक्रवर्ती असे होते. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. सकाळी कोलकत्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिली. गेल्या अनेक दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सोनाली यांनी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले होते. २००२ साली आलेल्या ‘हार जीत’ या चित्रपटात त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. याशिवाय ‘बंधन’ या सिनेमातील त्यांची भूमिकाही गाजली होती. सोनाली यांची प्रकृती ही खूपच बिघडत होती, असे सांगण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात देखील त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजारपणामुळे सोनाली या मनोरंजन विश्वापासून गेले अनेक दिवसापासून दूर होत्या, असेही सांगण्यात आले आहे. सोनाली या लिव्हरच्या आजारामुळे ग्रस्त होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पोटामध्ये खूप पाणी भरले होते. यामुळे त्यांना खूप त्रास होत होता.

याशिवाय त्यांना इतर आजार देखील होते, असेही सांगण्यात येत आहे. अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये मध्यंतरी सुधारणा झाली होती. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काहीच दिवसात त्यांची प्रकृती ही पुन्हा बिघडली आणि त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 31 ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या जाण्याने चक्रवर्ती कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. टीव्ही आणि सिनेइंडस्ट्रीतील विविध कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Team Hou De Viral