‘बिगबॉस’ मधील सोनाली पाटील अभिनय क्षेत्रात येण्याआधी करत असे हे काम

‘बिगबॉस’ मधील सोनाली पाटील अभिनय क्षेत्रात येण्याआधी करत असे हे काम

कलर्स मराठी वरील बिग बॉस थ्री हा शो आता चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये काम करणारे कलाकार देखील वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. यामध्ये आम्ही आपल्याला आज एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, जिने अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यापूर्वी एका वेगळ्या क्षेत्रात काम केले.

या अभिनेत्रीचे नाव सोनाली पाटील असे आहे. सोनाली पाटील सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चांगल परफॉर्मस करत आहे. ती वेगवेगळी टास्क देखील पार करताना दिसत आहेत .तिने नुकताच बिग बॉसच्या घरातील विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. “करूया आता कल्ला” या माध्यमातून तिने विद्यार्थ्यांचे प्रेमाचे धडे देखील घेतले.

यामध्ये तिने वेगळे प्रश्न देखील विचारले. सोनाली पाटील हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. देव माणूस या मालिकेमध्ये तिने काम केलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत तिने सरकारी वकिलाची भूमिका साकारली होती.

तिच्या भूमिकेला अनेकांनी पसंती देखील दिली होती. त्याचबरोबर जुळता जुळता जुळेना या मालिकेत देखील तिने काम केले होते. यासोबतच सोनली पाटील हिने वैजू नंबर वन या मालिकेतही काम केले होते. सोनाली पाटील ही मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यामुळे तिच्या बोलण्याची लकब अजूनही कोल्हापूर भागातीलच आहे.

बिग बॉस च्या घरामध्ये आता दोन नॉमिनेशन झालेले आहेत. पहिले नॉमिनेशनही अक्षय वाघमारे यांच झाले होते. अक्षय वाघमारे आता हा शो सोडून गेलेला आहे. अक्षय वाघमारेच्या जागी आदिश वैद्य हा स्पर्धक सहभागी झाला आहे. आदीश वैद्य याने देखील रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये चांगली भूमिका साकारली होती.

त्याचबरोबर या मालिकेमध्ये दुसरे नॉमिनेशन देखील सुरेखा कुडची यांचे झालेले आहे. त्यामुळे सुरेखा कुडची देखील घराबाहेर पडल्या आहेत. सुरेखा कुडची घराबाहेर पडताना अनेक कलाकारांना रडू आवरणे कठीण झाले होते. अनेक जण ढसाढसा रडले. यामध्ये स्नेहा वाघ ही अभिनेत्री मात्र सगळ्यात जास्त रडली.

याचे कारणही तसेच होते. कारण बिग बॉसच्या घरामध्ये स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची यांचा प्रचंड वाद झाला होता. त्यामुळेच स्नेहा हिला अतिशय वाईट वाटत होते. यामध्ये सहभागी झालेली सोनाली पाटील सगळ्यांसोबत संवाद साधत असते. तिचा नुकताच काही जणांशी देखील वाद झाला होता. मात्र, असे असले तरी ती सगळ्यांसोबत जमवून घेत असते.

सोनाली पाटील ही अभिनय क्षेत्रांमध्ये येण्याच्या आधी प्राध्यापिका होती. एका ज्युनिअर कॉलेजमध्ये तिने विद्यार्थ्यांना शिकवले आहे. काही वर्षे तिने नोकरी केली. मात्र, अभिनय क्षेत्राची आवड असल्याने तिने सुरुवातीला काही नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर काही जाहिरातीमध्ये देखील तिने केले असल्याचे सांगण्यात येते.

त्यानंतर तिला मालिकामध्ये छोट्या-मोठ्या भूमिका मिळाल्या. खऱ्या अर्थाने तिला देव माणूस मालिकेतून चांगली भूमिका मिळाली असे म्हणावे लागेल. तर यामध्ये सध्या असलेली सोनाली पाटील ही पूर्वीच्या आयुष्यामध्ये प्राध्यापिका होती.

Team Hou De Viral