हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे मराठमोळ्या सोनाली खरेचा पती, काजोलसोबतही केले आहे काम

हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे मराठमोळ्या सोनाली खरेचा पती, काजोलसोबतही केले आहे काम

अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिका किंवा चित्रपटाच्या सेटवर कलाकारांचे प्रेम जुळणे आणि नंतर त्यांनी लग्न करणे ही काही नवीन गोष्ट नाही. सोनाली खरे सोबतही असेच झाले आणि पंजाबी कलाकार बिजय आनंद याच्या प्रेमात ती पडली.

सोनाली खरेने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ती फार रुपेरी पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोनाली खरेचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिचे फोटो व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

सोनालीने बिजय आनंदसोबत लग्न करत संसार थाटला आहे. दोघांचेही लव्हमॅरेज आहे. बिजय आनंदने सिनेमात झळकण्यापूर्वी मालिकेत काम केले होते. आजच्या या पोस्टमध्ये तिच्या लव्हसेटोरीबद्दल आपल्याला सांगणार आहोत. वाचा, कशी आणि कुठे झाली सोनाली-बिजयची भेट…

मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे. बिजय आणि सोनाली यांची भेट ‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान झाले होते. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान दोघांचीही पहिली भेट झाली होती. तेथून त्यांच्या प्रेमालाही सुरुवात झाली होती. दोन-अडीच वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. एकमेकांच्या आवडी- निवडी जाणून घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मालिका विश्वासत एंट्री केल्यानंतर सिनेमात काम करायला सुरुवात केली होती.

बिजय आनंदने १९९८ साली ‘प्यार तो होना ही था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याच सिनेमातून तो प्रचंड प्रकाशझोतात आला होता.सिनेमात काजोल आणि अजय देवगणसह बिजय आनंदच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती.

‘आसमान से आगे ‘, ‘यश’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘स्माईल प्लिज’ हे सिनेमे आणि काही हिंदी टीव्ही मालिकेतून विजय आनंदने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सोनाली आणि बिजय यांना एक मुलगी आहे तिचे नाव सानया आहे.सोशल मीडियावर सोनाली आणि बिजय दोघांचेही एकत्र फोोट पाहायला मिळतात. दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघेही सोशल मीडियावर कपल गोल देत असतात. बिजय आनंद ‘शेरशाह’ यामध्येही झळकला होता.

Team Hou De Viral