‘बिगबॉस’ मधील या स्पर्धकाला खायचं ‘चिकन’ अन ‘मासे’

‘बिगबॉस’ मधील या स्पर्धकाला खायचं ‘चिकन’ अन ‘मासे’

कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू झालेली बिग बॉस मालिका दिवसेंदिवस आता रंगात आली आहे. या शोमध्ये आता वेगवेगळ्या टास्क मधून सगळे स्पर्धक जाताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये सोनाली पाटील ही देखील सहभागी झाली आहे. सोनाली पाटील हिने देव माणूस मालिकेत काम केले आहे.

देव माणूस मालिकेमध्ये तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे बिग बॉसमध्ये देखील ती आता प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन करताना दिसत आहे. तसेच या घरात सहभागी झालेल्या प्रत्येक जणा सोबत तिचे चांगले जमत आहे. यामध्ये विशेष करून सुरेखा कुडची यांच्या सोबत तिचे चांगले जमत आहे.

विशाल निकम सोबतही तिचे चांगले जमत आहे. यात विकास पाटील याच्या सोबतही ती अनेकदा चर्चा करताना दिसत असते. बिग बॉसच्या खेळामध्ये सध्या अनेकांना वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या एविक्शन राउंडमध्ये अभिनेता अक्षय वाघमारे हा घराबाहेर पडला आहे.

अक्षय वाघमारे हा घराबाहेर पडू नये, असे अनेक प्रेक्षकांना वाटत होते. मात्र, त्याचा घरामधील वावर हा मर्यादित होता. त्यामुळे त्याला या राउंडमधून समोर जावे लागले, असे देखील सांगण्यात येत आहे. अक्षयने उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांच्या सोबतच गट्टी केल्याचे पाहायला मिळाले.

त्याच बरोबर या दोघांसोबत चर्चा करताना दिसत होता. आता तो घराच्या बाहेर गेल्याने अनेक जण भाऊक झाले होते. दोन आठवड्यातच त्याला घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आता त्याच्या जागी आदेश वैद्य हा घरामध्ये आला आहे. त्यामुळे तो देखील आता चांगलेच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

स्नेहा वाघ सोबत त्याची चांगली गट्टी जमली. या शो मधून शिवलीला बाळासाहेब पाटील ही आपण होऊन घराबाहेर पडली आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे ती खूपच नाराज झाली होती. तसेच मला एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार आहे, असे तिने म्हटले होते.

मात्र, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना अशा शोमध्ये सहभागी होणे हे बरोबर नाही, असे देखील अनेकांचे म्हणणे होते. त्यानंतर ती एकदमच आजारी पडली. आजारी पडल्याने बिग बॉसने तिला काही दिवस वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ती घराबाहेर पडली. आता या शोमध्ये सहभागी झालेली सोनाली पाटील ही चर्चा करताना दिसत आहे.

सोनाली पाटील म्हणत आहे की, बिग बॉस काहीतरी वेगळ्या पद्धतीचा आम्हाला खाऊ घाला. चिकन, मटन, खाऊ घाला. अंडी नको. मासे खाऊ घाला असे ती म्हणत आहे. त्यावर त्याच्या शेजारचा स्पर्धक म्हणतो की, तुझी इच्छा येत्या शनिवारी मी पूर्ण करेन. त्यामुळे आता या मुद्द्यावरून देखील शो मध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

Team Hou De Viral