‘बिगबॉस’ मधील सोनाली पाटीलला जेव्हा मुलगा पाहायला आला, पहा काय म्हणाली ती

‘बिगबॉस’ मधील सोनाली पाटीलला जेव्हा मुलगा पाहायला आला, पहा काय म्हणाली ती

बिग बॉस मध्ये सहभागी झालेले कलाकार आता एकमेकांशी त्यांच्या भावना शेअर करताना दिसत आहेत. अनेकदा सकाळी चहा घेताना सर्वजण टेबलवर राऊंड करून सर्वजण आपापल्या आयुष्यातील प्रसंग सांगत असतात.

बिग बॉसमधील घरातील सदस्य सोनाली पाटील हिने देखील तिच्या आयुष्यातील एक असाच प्रसंग नुकताच सगळ्या सदस्यांसोबत शेअर केला. सोनाली पाटील हिचे कुटुंबीयांकडून तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिला एक मुलगा पाहण्यासाठी देखील आला होता.

या बाबतचा प्रसंग तिने या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. सोनाली पाटील हिने या आधी गाजलेल्या देव माणूस या मालिकेत काम केले आहे. देव माणूस ही मालिका आता संपली आहे. मात्र, असे असले तरी ती बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे.

देव माणूस मालिकेतील तिची वकिलाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सोनाली पाटील ही मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बिग बॉस शो मध्ये आता खरी मजा येताना दिसत आहे. कारण बिग बॉसमध्ये पहिला सदस्य आता घराबाहेर पडला आहे.

अभिनेता अक्षय वाघमारे हा या शोमधून आता बाहेर पडला आहे. तो अतिशय चांगल्या प्रकारे शोमध्ये वावरत होता. मात्र, ठराविक लोकांसोबतच तो जास्त काळ चर्चा करत असताना दिसत होता. त्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले, असे देखील आता सांगण्यात येत आहे.

अक्षय वाघमारे याच्या जागी आता बिग बॉसच्या शोमध्ये आदिश वैद्य हा कलाकार सहभागी झाला आहे, तर राऊंड टेबल मध्ये बोलताना सोनाली पाटील हिने तिचा मुलगा पाहायला आल्याचा अनुभव शेअर केला आहे. सोनाली पाटीलच्या शेजारी मीनल शाह बसलेली आहे. तर समोरून तृप्ती देसाई या आलेल्या आहेत.

सोनाली पाटील म्हणाली की, मला ज्यावेळेस मुलगा पाहायला आला होता. त्यावेळेस त्यांनी माझी खणा-नारळाने ओटी भरली होती. माझ्या ओटी मध्ये त्यांनी जवळपास मोठा नारळ टाकला होता. एवढे मोठे गहू टाकले होते. त्याचबरोबर एक डझन केळी टाकली होती. हे वजन मला तेव्हा पेलवत नव्हते.

त्यानंतर मुलाकडचे लोक सांगत होते की, नमस्कार कर मात्र मला असा प्रश्न पडला होता की, एवढं सगळं वजन घेऊन नमस्कार तरी कसा करावा. त्यामुळे त्यांना मी उभ्याने नमस्कार केला. असे सोनाली पाटील हिने सांगितले.

त्यानंतर मी आतमध्ये गेल्यानंतर मला आईने याचा जाब विचारून समजून सांगितले की, असा नमस्कार करत असतात का? वाकून नमस्कार करावा लागतो. त्यावर सोनाली म्हणाली की, मुलींची काही इज्जत आहे की नाही यार. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.

Team Hou De Viral