नेमकं ‘त्या’ फोटोत अस काय होत, ज्यामुळे सोनम कपूर वर भडकले चाहते, एकाने तर झाडू मारण्याचा सल्ला दिला

नेमकं ‘त्या’ फोटोत अस काय होत, ज्यामुळे सोनम कपूर वर भडकले चाहते, एकाने तर झाडू मारण्याचा सल्ला दिला

अभिनेत्री सोनम कपूर ही एका फोटो वरून सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या फोटोमध्ये सोनम कपूर हिने विचित्र अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. सोनम कपूर ही बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी होय. सोनम कपूर हिने बॉलिवुडमध्ये येण्याआधी काही जाहिरातींमध्ये देखील काम केले होते. त्यानंतर तिने चित्रपटात पदार्पण केले.

सावरिया या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर कपूर हा दिसला होता. या चित्रपटानंतर दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा खूप झाली होती. या चित्रपटातील तिची चांगली भूमिका होती. मात्र, चित्रपटातील तिच्या निरागस लूक ने सगळ्यांना प्रभावित केले होते.

मात्र, त्यानंतर तिला काही खास कमाल करता आली नाही. त्यानंतर तिने अभिषेक बच्चन सोबत दिल्ली ६ हा चित्रपट केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती काही चित्रपटात दिसत राहिली. तिचा सलमान खान सोबत चा प्रेम रतन धन पायो हा चित्रपट केला. हा चित्रपट त्यावेळी बर्‍यापैकी चालला होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून तिला चित्रपटात कामाच्या ऑफर मिळत नव्हत्या.

तसेच corona महामारी मुळे आता ही तिच्याकडे ऑफर नाहीयेत. दोन वर्षांपूर्वी तिने लग्न केले आहे. तिचा पती एक बिझनेस मॅन आहे. सोनम कपूर ही बॉलीवुडची फॅशन दिवा म्हणून ओळखली जाते. कुठलेही नवीन ड्रेस आले की फोटोसेशन करण्याकडे तिचा कल हा असतो. बॉलीवूडची सर्वाधिक स्टाईल्स अभिनेत्री म्हणून देखील तिची गणना होते. तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत असते.

तिचा ड्रेस सेन्स हा खूप चांगला असल्याचे बॉलीवूड मध्ये सांगण्यात येते. आपल्या नेहमीच्या अपडेट देखील इंस्टाग्राम वर देत असते. काही दिवसांपूर्वी तिने असाच एक फोटो शेअर केलेला आहे. या फोटोमध्ये ती खुर्चीवर बसलेली आहे. यामध्ये तिने हे भगवान क्या करू, अशी कॅप्शन दिली आहे. यावर चाहत्यांनी तिला चांगले ट्रॉ ल केल आहे. अनेकांनी तिला वेगवेगळे सल्ले दिले आहेत.

एकाने तर तिला चक्क झाडू मारण्याचा सल्ला दिलेला आहे. आपण नुसते फोटो टाकत असतात, तर गरिबांसाठी देखील काही करा असे देखील सल्ले तिला देण्यात आले आहे. एकूणच सोनम कपूरला आता फोटो शेअर केल्यानंतर ट्रोल होण्याची जणू सवयच लागली आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *