सोनमच्या लग्नात असे काय घडले होते ज्यामुळे अनिल कपूरच्या बायकोला सलमान-शाहरुख समोर हात जोडावे लागले होते

सोनमच्या लग्नात असे काय घडले होते ज्यामुळे अनिल कपूरच्या बायकोला सलमान-शाहरुख समोर हात जोडावे लागले होते

सोनम कपूर ही प्रसिद्ध अभिनेत्री अनिल कपूर यांची मुलगी होय. सोनम कपूर च्या आईचे नाव सुनिता असे आहे. सोनम कपूर हिने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात रणबीर कपूर याच्या सोबत तिची भूमिका होती. हा चित्रपट बॉलिवूड मध्ये काही चालला नाही.

मात्र, या चित्रपटाची चर्चा त्यावेळी खूप झाली होती. या चित्रपटानंतर रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांच्यात काहीतरी शिजत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मात्र, कालांतराने त्यांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आले. त्यानंतर सोनम कपूरचे नाव काही जणांसोबत जोडण्यात आले.

मात्र, त्यानंतर सोनम कपूर हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत दिल्ली ६ चित्रपट केला. त्यानंतर तिला चित्रपट मिळाले नाही. त्यानंतर तिने इतर काही चित्रपट केले. मात्र, हे चित्रपट काही चालले नाही. सोनम कपूर एक बोल्ड फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. कुठलेही फॅशनेबल ड्रेस आले की आधी सोनम कपूर ती परिधान करत असल्याचे आजवर अनेकांना माहित आहे.

डिझाईन संबंधित अनेक कामकाज देखील ती करत असते. बॉलीवूड मध्ये चित्रपट मिळेना झाल्यानंतर तिने 2018 मध्ये लग्न केले होते. या लग्नाला अनेकांची उपस्थिती होती. सोनम कपूर हिने लग्न आनंद आहुजा याच्यासोबत झाल आहे. या दोघांची जोडी चांगली जमली आहे. नुकताच या दोघांनी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला आहे.

यानिमित्ताने सोनम हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे अनेक जण धम्माल करताना दिसत आहे. रणबीर कपूर, शाहरुख खान, सलमान खान यासह अनेक दिग्गज अभिनेते या लग्नाला उपस्थित होते. याच लग्नात कॅटरिना कैफ देखील आली होती. सूनिता कपूर यांनी देखील जोरदार डान्स केला होता.

शाहरुख खान आणि सलमान खान यांनी देखील करण अर्जुन च्या गाण्यावर नृत्य केले होते.याच दरम्यान शाहरुख आणि सलमान स्टेजवर येण्यास टाळाटाळ करत होते. यावेळी सुनीता कपूर यांनी त्यांच्या समोर हात जोडले. अखेर दोघेही स्टेजवर आले आणि धमाल नृत्य करू लागले.

आपल्या सर्वांना माहीत आहे की, गेल्या काही वर्षापासून सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात जमत नाही. दोघांचे भांडणला कॅटरिना कैफ ही कारणीभूत होती.

Team Hou De Viral