साऊथच्या ‘या’ कलाकारांनी बदललाय स्वतःचा धर्म , 2 आणि 4 नंबर वाला कलाकार तर…

साऊथच्या ‘या’ कलाकारांनी बदललाय स्वतःचा धर्म , 2 आणि 4 नंबर वाला कलाकार तर…

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे कलाकार आहेत की, ज्यांनी आपला मुळ धर्म बदलून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश केला आहे. याचे कारण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दडलेले आहेत. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये असे कुठले कलाकार आहेत की, ज्यांनी आपला मूळ धर्म बदलून दुसऱ्या धर्मात प्रवेश केला आहे. चला तर मग जाणून घेऊया.

1) नयनतारा – नयनतारा ही दक्षिणात्य चित्रपटसृष्टी मधील एक उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे. तामिळमध्ये तिने अनेक चित्रपट केले आहेत. नयनतारा ही सुरुवातीला ख्रिचन होती. मात्र त्यानंतर तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला. आणि हिंदू धर्म तिने आता आचरणात आणण्यास देखील सुरुवात केली आहे.

2) ए आर रहमान – ए आर रहमान हे दक्षिणेसह देशातील एक मोठे संगीतकार, गीतकार आहेत. रहमान यांनी 1989 मध्ये आपला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला. सुरुवातीला त्यांचे नाव दिलीपकुमार असे होते. त्यानंतर त्यांनी अल्लारखा रहमान हे नाव धारण केले.

3) नगमा – नगमा हिने बॉलीवूडसह दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. तिचे नाव काही काळ क्रिकेटर सौरव गांगुली याच्या सोबत देखील जोडल्या गेले होते. नगमाची आई मुस्लिम होती, तर वडील हिंदू होते. काही वर्षांत नगमा हिने ईसाई धर्माचा स्वीकार केला.

4) लिसी – लिसी दक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील एक मोठी अभिनेत्री आहे. 1990 मध्ये तिने ज्येष्ठ दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी लग्न केले. त्यानंतर तिने आपल्या धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला.

5) खुशबू – खुशबू ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील एक जेष्ठ अभिनेत्री आहे. 200 पेक्षा जास्त चित्रपट तिने काम केले आहे. त्यामुळे तामिळ, तेलगू, कन्नडसह अनेक चित्रपट केले. तिने सुंदर सी यांच्या सोबत लग्न केल्यानंतर मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केला.

6) मोनिका – मोनिका हिनेदेखील अनेक चित्रपटात काम केले आहे. मोनिका हिने 2014 मध्ये मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. आता ती एम जे रहिमा या नावाने ओळखल्या जाते.

7) अॅमी – मल्याळम चित्रपटांमध्ये अॅमी हिने आपली कामगिरी दाखवली आहे. अॅमी ने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. ती मुळात ख्रिश्चन धर्माची आहे. मात्र, कैलाश याच्यासोबत लग्न केल्यानंतर तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि आपले नाव देखील चित्रा असे ठेवले आहे.

8) जोलोम – दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील दिग्गज अभिनेत्री जोलोम हिने अनेक मल्याळम चित्रपट तिने केलेले आहेत. तिने चंद्रशेखर पिल्लई यांच्या सोबत लग्न केल्यानंतर ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला. त्याचप्रमाणे आपले नाव देखील गौरी असे ठेवले.

9) युवान शंकर राजा – युवान शंकर राजा यांनी देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत आपण इस्लाम धर्म स्वीकारल्याचे ट्विटरवर सांगितले.

Team Hou De Viral