36 वर्षांनंतर ही वर्षाची ‘ती’ सवय अजूनही गेलेली नाहीये; प्रशांत दामले यांचा धक्कादायक खुलासा

36 वर्षांनंतर ही वर्षाची ‘ती’ सवय अजूनही गेलेली नाहीये; प्रशांत दामले यांचा धक्कादायक खुलासा

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे सारखं काहीतरी होतंय हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शन मराठमोळ्या मराठवाड्याच्या संकर्षण कराडे याने केले आहे.

या नाटकाबाबतच्या अनेक मुलाखती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या नाटकाबाबत एक गोष्ट आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. या नाटकाबद्दल वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले यांनी एकमेकाबद्दलचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रशांत दामले यांना आपण आजवर अनेक मालिका, नाटक, चित्रपट यातून पाहिले आहे. मात्र, एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट हे नाटक रंगमंचावर प्रचंड गाजलेले आहे. प्रशांत दामले यांनी काम केलेले सगळे चित्रपट देखील गाजलेले आहेत. मात्र, आता सारखं काहीतरी होतंय या निमित्याने वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले तब्बल 36 वर्षानंतर एकत्र येत आहेत.

याबाबत दोघांनी नुकतीच एका वेब पोर्टल ला मुलाखत दिली आहे.या नाटकाबद्दल त्यांनी याबाबत दिलखुलास चर्चा केलेली आहे. यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर देखील दिलेली आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन संकर्षण कराडे हा करत आहे. संकर्षण कराडे बद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, संकर्षण हा अतिशय उत्कृष्ट असा दिग्दर्शक आहे.

त्याचं माझं चांगलं ट्युनिंग गेल्या काही वर्षात जमल आहे. त्याच्या सोबत आजवर तीन नाटकं मला करता आली. किचन कल्लाकार या शोमध्ये देखील मी त्याच्यासोबत काम करत असतो. तो अतिशय हरहुन्नरी कलाकार आहे. तो या नाटकाचा डायरेक्ट असल्यामुळे त्याला सगळं काही करायच आहे आणि आम्ही या नाटकात काम करणारे कलाकार आहोत.

त्यामुळे आम्हाला आमचं काम करायच आहे. तू म्हणशील तसं हे नाटकही सध्या संकर्षण‌ याचे लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. यासाठी प्रशांत दामले यांची देखील संकर्षण याची मदत झाली आहे. आता वर्षा उसगावकर देखील छोट्या पडद्यावर सध्या सक्रिय झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी मालिकांमध्ये काम केले होते.

मात्र आता महेश कोठारे यांच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये वर्षा उसगावकर या माईच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांची ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे आता मध्येच त्यांचं सारखं काहीतरी होतंय हे नाटक आल्याने अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि अनेक जण प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

सारखं काहीतरी होतंय या नाटकाबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांना काहीतरी सारखं होत असतं त्याबद्दलची ही कथा आहे. मात्र, ही कथा एका कुटुंबातील आहे. आई, आजी, आजोबा हे सगळे काही यात आहेतच. मात्र, यामध्ये एक पती, पत्नी, गृहिणी आणि मुलगी यामध्ये असणारे संभाषण यामध्ये दाखवण्यात आले आहे.

त्यावरून सारखं काहीतरी होतंय हे नाटक तयार करण्यात आलं आहे. वर्षा उसगावकर यांचा अनुभव प्रशांत दामले यांनी शेअर करताना सांगितले की, वर्षा उसगावकर हिली जुन्या काळातली सवय अजून देखील आहे. 90 मध्ये देखील आम्ही नाटक करत होतो. त्यावेळेस देखील वर्षा उसगावकर तिला एक जुनी सवय होती.

ती तिची सवय अजूनही मोडली नाही. वर्षा उसगावकर हिला काय, कुठे, कसं, सगळं काही आधीच उत्तर द्यावे लागतात. वर्षा उसगावकर यांनी देखील याबाबत दुजोरा देऊन प्रशांत म्हणतोय ते खर आहे असल्याचे सांगितले आहे, तर आपल्याला प्रशांत दामले, वर्षा उसगावकर आवडतात का आम्हाला तर नक्की सांगा.

Team Hou De Viral