गुडन्यूज ! तब्बल ‘आठ’ वर्षानंतर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

गुडन्यूज ! तब्बल ‘आठ’ वर्षानंतर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

अनेकदा आपण मालिका पाहत असताना एखादी अभिनेत्री आपल्याला आवडून जाते. मात्र ही मालिका संपत असते. त्यानंतर ही अभिनेत्री आपल्याला पुन्हा दिसत नाही आणि प्रेक्षक मग विचार करू लागतात की, ही अभिनेत्री गेली तरी कुठे.

आज आम्ही आपल्याला एका अशाच अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत. ही अभिनेत्री अतिशय लोकप्रिय अशी आहे. ही अभिनेत्री तब्बल आठ वर्षानंतर मालिकेमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकी ही अभिनेत्री आहे तरी कोण..

अनेकदा आपण मालिका पाहत असताना एखादा चेहरा आपल्याला ओळखीचा वाटतो. त्यानंतर तो चेहरा आपल्याला आवडीचा वाटतो आणि आपल्या घरातील वाटतो आणि त्या चेहऱ्यासोबत आपण बोलू देखील लागतो. मात्र, एक दिवस तो अचानक गायब होतो आणि मग आपण त्याचा शोध घेऊ लागतो, असे अनेकदा अनेकांसोबत घडू लागते.

आज आम्ही आपल्याला ज्या अभिनेत्रीबद्दल माहिती सांगणार आहोत, त्या अभिनेत्रीचे नाव स्पृहा जोशी असे आहे. स्पृहा जोशी ही मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मालिका, नाटक, चित्रपट अशा सगळ्यात क्षेत्रात तिने मुशाफिरी केली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून ती मालिका विश्वापासून गायब होती. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेमध्ये तिने काम केल्याचे आपण पाहिले.

ही मालिका देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेमध्ये तिने अतिशय झंझावती भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर ती छोट्या पडद्यापासून गायब झाली. मध्यंतरी तिने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र, तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेमध्ये तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

मध्यंतरी तिने काही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केल्याचे आपण पाहिले असेल. मात्र आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुन्हा येणार असल्याचे सांगण्यात येते. तिने याबाबत बोलताना सांगितले की, आता पुन्हा एकदा मी मालिका विश्वामध्ये आपल्याला दिसणार आहे. अनेक दिवसापासून मालिकांमध्ये येण्याचा प्रयत्न होता. मात्र, काही खाजगी अडचणींमुळे मालिकांमध्ये मला येत आले नाही.

मात्र, आता मी मालिकेमध्ये परत येत आहे. स्पृहा जोशी आपल्याला लवकरच लोकमान्य या मालिकेमध्ये दिसणार आहे या मालिकेमध्ये जी महत्त्वाची भूमिका असणार आहे. लोकमान्य ही मालिका लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे, तर आपल्याला स्पृहा जोशी हिला या मालिकेत पाहायला आवडेल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral