चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कोणी होतं ‘कंडक्टर’ तर कोणी ‘वेटर’, नशिबाच्या जोरावर आज हे स्टार्स आहेत सुपरस्टार

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कोणी होतं ‘कंडक्टर’ तर कोणी ‘वेटर’, नशिबाच्या जोरावर आज हे स्टार्स आहेत सुपरस्टार

कोणतीही व्यक्ती कोणत्याही कामात सुरुवातीपासूनच यशस्वी होत नसते. प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्यापूर्वी त्याचा एक भूतकाळ असतोच. लोकांना वाटते की फक्त स्टार किड यांनाच चित्रपटांमध्ये भूमिका सहज मिळते. पण हि विचारसरणी पूर्णपणे चुकीची आहे. बॉलिवूडमध्ये असेही काही स्टार्स आहेत ज्यांचा प्रवास हा एकदम हलाखीची गेलेला आहे. आज आपण अशाच काही स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत. या आर्टिकलमध्ये आम्ही आपल्याला आपले आवडते स्टार्स बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यापूर्वी काय काम करायचे हे सांगणार आहोत.

सोनम कपूर – आज सोनम कपूर फॅशन क्वीन म्हणून ओळखली जाते. पण जेव्हा सोनम शिकण्यासाठी सिंगापूरला गेली होती तेव्हा तिला पॉकेटमनी फारच कमी मिळत असे. पॉकेटमनी कमी असल्याने सोनमने तेथील रेस्टॉरंटमध्ये वेटर्स म्हणून काम केले आहे. सिमी ग्रेवाल यांच्या मुलाखती दरम्यान तिने हे सांगितले होते.

रणवीर सिंग – रणवीर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी एका जाहिरात करणाऱ्या एजन्सीमध्ये काम करायचा. ही जाहिरात एजन्सी मुंबईत होती, त्यामध्ये तो कॉपीरायटरच्या पोस्टवर होता. रणवीरला त्याचा दिग्दर्शक मित्र मनीष शर्मा यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित केले.

सोनाक्षी सिन्हा – दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी कॉस्ट्यूम डिझाइनर होती. सोनाक्षीने 2005 मध्ये मेरा दिल लेके देखो या चित्रपटाच्या वेशभूषाची रचना केली होती.

अरशद वारसी – पूर्वी अरशद वारसीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तर तो पैसे मिळवण्यासाठी घरोघरी सौंदर्यप्रसाधने विकत असे. वयाच्या 17 व्या वर्षापासून त्याने सेल्समन म्हणून काम करण्यास सुरवात केली होती.

नवाजुद्दीन सिद्दीकी – नवाज यांचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ वडोदरामध्ये केमिस्ट म्हणून काम केले. नंतर दिल्लीला आल्यानंतर एक थिएटर ग्रुपचा भाग झाले. पण जास्त पैसे न मिळाल्यामुळे त्याला चौकीदार म्हणून काम करावे लागले.

जॉनी लीव्हर – आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारे जॉनी लीव्हर प्रसिद्ध होण्यापूर्वी मुंबईच्या रस्त्यावर पेन विकत असे. 1981 मध्ये ‘डर का रिश्ता’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलेच नाही.

शाहरुख खान – किंग खान शाहरुख खान बद्दल कोणालाच काही माहित नव्हते. प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहरुख कॉन्सर्ट अटेंडंट म्हणून काम करायचा. शाहरुखला पंकज उधास यांच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी 50 रुपये फीही देण्यात आली होती.

जॉन अब्राहम – जॉन अब्राहमहा एमबीए पदवीधर आहे. जॉनने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. अभिनयापूर्वी जॉन मीडिया एन्टरटेन्मेंट कंपनीत काम करायचा. तो मीडिया प्लॅनर म्हणून काम करत होता.

रजनीकांत – जगातील सर्वात मोठे सुपरस्टार रजनीकांत चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी बस कंडक्टर म्हणून काम करायचे हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. बसमध्ये तिकिट काढण्याच्या शैलीने प्रभावित होऊन एका दिग्दर्शकाने त्यांना चित्रपटांमध्ये संधी दिली.

बोमन इराणी – बोमन इराणी हे चित्रपटात अभिनय कराण्यापूर्वी हॉटेलमध्ये काम करायचे. त्यांनी ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस अटेंडंट म्हणून काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral