‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ मध्ये विदेशी दिसणारी ‘मारिया’ विदेशी नसून आहे अस्सल भारतीय अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ मध्ये विदेशी दिसणारी ‘मारिया’ विदेशी नसून आहे अस्सल भारतीय अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

झी मराठी वाहिनीवर सध्या मनोरंजनाच्या वेळेत खूप मोठे बदल घडवण्यात आले आहेत. गेले अनेक वर्ष सुरू असलेल्या मालिकांच्या वेळा बदलल्या गेल्या. तेरा वर्षांच्या वर सुरू असलेला लोकप्रिय शो होम मिनिस्टर आता संध्या. ६ वाजता पाहायला मिळतो.

तर गेले तीन वर्षांच्या वर नंबर एक वर अनेकदा ठामपणे दिसून येणारी मालिका तुझ्यात जीव रंगला आता संध्या. ६.३० वा. पाहायला मिळते. हे सगळे बदल घडवून आणले गेले ते एका नवीन मालिकेसाठी. ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ ही मालिका नुकतीच सुरू झाली असून त्या बद्दल बरीच चर्चा रंगत आहे.

मालिकेचे मुख्य आकर्षण ठरत आहे मालिकेमधील ‘वेडिंगची बायकू’. मालिकेत एका फॉरेन रिटर्न विदर्भातील मुलाची कथा रेखाटली गेली आहे. फॉरेन रिटर्न मुलगा घरी परततो ते सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आणि त्यात असते एक विदेशी डॉल. ही डॉल म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर आहे या फॉरेन रिटर्न मुलाची दुसरी बायको म्हणजेच वेडिंगची बायकू.

घरात त्याची आधीच लग्न झालेली लग्नाची वाईफ तर आहे पण आता आलीये ही नवीन बायकू. त्यामुळे वेडिंगच्या बायकूमुळे खूप नाट्य घडणार हे काय वेगळं सांगायला नको. वेडिंगची बायकू म्हणजेच या विदेशी डॉलच्या अवतीभवती खूप चर्चा आहे.

तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही विदेशी अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. क्यूट, नाजूक अशी विदेशी डॉल खरं तर विदेशी नाहीच आहे. अगदी बरोबर वाचलंत तुम्ही, ही विदेशी दिसणारी डॉल मुळात भारतीयच आहे आणि तिचं नाव आहे लियाना आनंद.

ही सौंदर्यवती मुळात भारतीय असून मालिकेत तिला एक वेगळा लूक दिला गेला आहे. तिच्या केसांचा रंग बदलला गेला आहे. तिचा मेकअप तसा केला गेला आहे जेणेकरून ती फॉरेनर दिसेल. लियाना एक नवखी अभिनेत्री असून तिच्या खासगी आयुष्यात सुद्धा ती फारच फॅशनेबल आहे.

नुकतीच तिची झलक झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात सुद्धा दिसली. तिला या मालिकेसाठी वेगळं ट्रेनिंग दिलं गेलं आहे असं बोलंल जात आहे. तसंच तिने या भूमिकेसाठी एक्सेंट सुद्धा आत्मसात केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral