‘सुहाग’च्या शूटिंग दरम्यान मूर्तीच्या मागे लपून रेखा करायची असले कृत्य, मूर्तीच्यामागे झोपा….

‘सुहाग’च्या शूटिंग दरम्यान मूर्तीच्या मागे लपून रेखा करायची असले कृत्य, मूर्तीच्यामागे झोपा….

बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्या त्यांच्या सौंदर्य व अदाकारीसाठी ओळखल्या जातात. पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे.

करियरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सावळ्या रंगामुळे त्यांना खूप टीका ऐकावी लागली होती.रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. रेखा काही दिवसांपूर्वी एका डान्स शोमध्ये आल्या होत्या.

यावेळी त्यांनी १९७९ साली अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुहाग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक रंजक किस्सा सांगितला. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, रेखा यांनी सांगितले की, चित्रीकरणादरम्यान त्या दुर्गा देवीच्या मूर्तीच्या मागे जाऊन डुलकी घ्यायच्या. कारण कॅमेऱ्यासमोर फ्रेश वाटेल.

सुहाग चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन व्यतिरिक्त शशी कपूर व परवीन मुख्य भूमिकेत होत्या. त्याचबरोबर अमजद खान, निरुपा रॉय, कादर खान, रंजीत व जीवन हे प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट प्रेक्षकांना त्याकाळी खूप भावला होता.

रेखा यांनी खुबसूरत, मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, खिलाडियों का खिलाडी, कोई मिल गया यांसारख्या चित्रपटात काम केले.रेखा २०१५ साली प्रदर्शित झालेल्या शमिताभ चित्रपटात केमिओ केला होता.

या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्याच्याआधी २०१४ साली शर्मन जोशी अभिनीत सुपर नानी चित्रपटात त्या दिसल्या होत्या.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral