‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, या मुख्य कलाकाराचे मालिकेत होणार निधन..

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, या मुख्य कलाकाराचे मालिकेत होणार निधन..

सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका देखील सध्या प्रचंड चालत आहे. या मालिकेमध्ये सर्वच पात्रांनी चांगली भूमिका केली आहे. मात्र, विशेष म्हणजे जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री हे सगळ्यांनाच आवडत आहे. जयदीप याचे खरे नाव मंदार जाधव आहे.

मंदार जाधव याने अनेक हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. या मालिकेत वर्षा उसगावकर यांची देखील भूमिका आहे वर्षा उसगावकर यांनी देखील चांगले काम केले आहे. अनेक वर्षानंतर वर्षा उसगावकर या मालिकेत दिसत आहेत. याआधी मंदार याने हिंदीमध्ये आलादिन मालिका केली होती ही मालिका त्यावेळी चांगली चालली होती.

तर या मालिकेमध्ये गौरीच्या भूमिकेमध्ये आपल्याला गिरजा प्रभू ही अभिनेत्री दिसत आहे. सध्या ही मालिका प्रचंड चालताना दिसत आहे. या मालिकेमध्ये इतर भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. शालिनी वहिनीची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते. ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे.

माधवी निमकर हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये एक नवीनच वळण येणार आहे. मालिकेमध्ये पाच वर्षाचा लीप आपल्याला दाखवण्यात येणार आहे. मालिकेमध्ये आता जयदीप आणि गौरी यांची ताटातूट होणार असल्याचे आपल्याला दाखवण्यात येणार आहे.

जयदीप आणि लक्ष्मी हे कुठेतरी गायब झालेले आहेत. त्यामुळे गौरी ही आता एकटीच आयुष्य जगणार का अनेकांचा असा समज झाला आहे. जयदीप आणि लक्ष्मी यांची निधन झाले आहे. मात्र, असे काहीही झाले नसून ते दोघेही मालिकेत पुन्हा परत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गौरी हिला देखील हाच विश्वास असतो की जयदीप हा परत येणार आहे.

तसेच लक्ष्मी देखील परत येणार आहे. मात्र, शिर्के पाटील कुटुंबीयांनी ही आशा सोडून दिलेली असते. त्यामुळे आता हे मालिकेत पुढील काय होणार हे पाहणे फार आवश्यक ठरणार आहे.

Team Hou De Viral