मालिकेतील ‘कृत्य’ पाहून या अभिनेत्रीला महिलांकडून ‘मारहाण’

मालिकेतील ‘कृत्य’ पाहून या अभिनेत्रीला महिलांकडून ‘मारहाण’

स्टार प्रवाह वाहिनी वरील सुख म्हणजे नक्की काय असतं दिवसेंदिवस उत्कंठता निर्माण करताना दिसत आहे. काही भागात आपण पाहिले आहे की जयदिप हा माई व दादा साहेबांचा मुलगा नसतो, गौरी ही माईंची मुलगी असते. यानंतर या मालिकेत करण्यात आलेला हा बदल प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

या मालिकेतील जयदीप आणि गौरी या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरलेली आहे. या मालिकेतील सर्व पात्र त्यांच्या अनुभवानुसार अभिनय करताना दिसत आहेत. यातील माईंची भूमिका वर्षा उसगावकर साकारत आहे. वर्षा उसगावकर यांचा मराठी सिनेसृष्टीतील अनुभव खुप असल्यामुळे त्या छोट्या पडद्यावरील मालिकेत देखील काम करताना त्यांचा अनुभव हा बाकी सर्व कलाकारांना मिळत असतो.

ही मालिका जयदीप आणि गौरी त्यांच्या अवतीभवती सतत फिरत असते. शालिनी वहिनी या शिर्के पाटील यांची मोठी सून असते. परंतु शालिनी ला गौरी सुरुवातीपासूनच आवडत नसते आणि तिच्यावर सुडी भावनेनी नेहमी शालिनी कटकारस्थान करत असतात. शालिनी म्हणजेच माधवी निमकर. माधवीने सुख म्हणजे काय असतं या मालिकेत नकारात्मक भूमिका अगदी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.

ही भूमिका साकारत असतानाच तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतः चे स्थान निर्माण केले आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी चे कटकारस्थान पाहून प्रेक्षकांना तिच्याबद्दल खूप राग येतो हीच माधवीची अभिनयाची पोचपावती आहे असे म्हणावे लागेल नुकत्याच एका शोमध्ये माधवी निमकर हिने तिच्या सोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे.

माधवी म्हणाली एका कार्यक्रमात असताना दोन महिलांनी तिला पाठीत बुक्की मारली याचे कारण म्हणजे ती नेहमीच शिर्के पाटील कुटुंबीयांना त्रास देत असते. मालिकेत नेहमीच शालिनी नाही केला त्रास देत असते . नकारात्मक भूमिका करत असल्यामुळे तिला हा मार खावा लागला आहे. माधवी निमकरणे तिच्या अभिनयाची सुरुवात 2007 मध्ये केली आहे.

माधवीने तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे .गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून बोलावण्यात आले होते. यानंतर अवघाचि संसार या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.माधवीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांना माधवीची सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील नकारात्मक भूमिका देखील खूप भावली आहे.

Team Hou De Viral