‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा होणार शेवट

सध्या स्टार प्रवाह वर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. साधारण दोन वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांची प्रेम कहाणी दाखविण्यात आली आहे. मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू यांनी अनुक्रमे या भूमिका साकारल्या आहेत.
तर आपल्याला वर्षा उसगावकर देखील या मालिकेमध्ये दिसत आहेत. तर आता या मालिकेचा शेवट लवकरच होणार आहे. आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मालिकेचा शेवट कशा पद्धतीने होणार आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका एका बंगाली मालिकेवर आधारित आहे. मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की, गौरी ही प्रेग्नेंट असते आणि लवकरच ती गुड न्यूज देणार असते. त्यामुळे शिर्के पाटलांच्या वाड्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. जयदीप आणि गौरी यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो.
मात्र, माईसाहेब घरी परत आल्यानंतर त्या पहिले सारखं पुन्हा एकदा करतात. जयदीप देखील आपला निर्णय बदलतो. काही दिवसानंतर माईसाहेब गौरीच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित करतात. तर शालिनी आणि तिच्या टीमचे दुसरीकडे कारस्थान हे सुरू असते. पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळेल की, गौरी एका गोंडस मुलीला जन्म देईल.
त्यानंतर गौरी असा निर्णय घेते की, ती कंपनीमध्ये जाणार नाही. गौरी तिचे सगळे अधिकार हे जयदीप याला देते. तर दादासाहेब देखील जयदीपला सांगतात की, तुम्ही कंपनी सांभाळा आणि गौराबाई आपल्या बाळाला सांभाळणार. उदयरावांच्या हाती ही जबाबदारी दिली तर ती कंपनीला विकून खाऊन टाकतील. त्यामुळे तुम्ही ती जबाबदारी स्वीकारा, असे ते म्हणतात.
तर गौरीने माई दादांना नातवंड दिल्याने दोघेही तिचा खूपच लाड करत असतात. तर शालिनी हिला अजूनही मुलं न झाल्याने ती गौरीवर जवळ जळत असते. तर दुसरीकडे जयदीप आता गौरी हिला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी प्रयत्न करतो. तर गौरी ही त्याला म्हणते की, मला कंपनीत यायचं नाही मला दुसरं काही करायचं आहे.
त्यावर जयदीप तिला म्हणतो की तुला काय करायचं आहे. त्यावर गौरी म्हणते की, मला वकील व्हायचं आहे. त्यानंतर जयदीप हा निर्णय घेतो तिला वकील करायचा आणि माई दादांना देखील सांगतो. त्यामुळे ते दोघेही आनंदी होतात. तर वकील बनण्यासाठी गौरी ही तीन वर्ष मुंबईला जाते. तर मालिकेमध्ये मध्ये आपल्याला तीन वर्षाचा लीप पाहायला मिळणार आहे.
गौरी ही वकील बनवून मुंबईहून कोल्हापूरला येते. त्यानंतर तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात येते. तिची ही सगळी प्रगती पाहून शालिनी हिला मात्र खूपच त्रास होतो. आता गौरी ही पहिल्यासारखी साधी भोळी राहत नाही तर ती खूपच स्ट्रॉंग बनते. तर दुसरीकडे गौरी हिला शालिनी त्रास द्यायच ठरवते. मात्र आता ती गौरीला त्रास न देता तिच्या मुलीला त्रास देण्याच ठरवते.
शालिनी ही एका गुंडाला पैसे देऊन गौरी हिच्या मुलीला पळून न्यायला सांगते. तर गौरी आणि जयदीप हे खूपच घाबरतात. मात्र हे सगळं काही मल्हार ऐकत असतो आणि शालिनी हिने सर्व काही केले ते सांगतो. त्यानंतर मल्हार हा गौरीच्या बाळाला परत घेऊन येतो.
त्यानंतर मल्हार हा शालिनी हिला घटस्फोट देतो आणि तिच्या माहेरी पाठवून देतो आणि मालिकेत मग नंतर तिघेही भाऊ एकत्र येऊन नंदिनी गृह उद्योग सांभाळतात, असा काहीसा शेवट या मालिकेचा होणार आहे मग देवकी ही देखील आपले कारस्थान थांबणार आहे..