दुसऱ्या मालिकेची कथा चोरल्यामुळे या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी घातल्या शिव्या

दुसऱ्या मालिकेची कथा चोरल्यामुळे या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी घातल्या शिव्या

झी मराठीवर सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे यांच्या प्रमुख भूमिका दिसत आहेत. या प्रमाणे यामध्ये एका बालकलाकाराची भूमिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. ती म्हणजे मायरा वायकुळ हिची.

मायरा हिने मालिकेमध्ये परी ही छोट्या मुलीची भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे याने अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. श्रेयस तळपदे याने या मालिकेमध्ये यश नावाची ही भूमिका साकारली आहे. तर प्रार्थना बेहेरे हिने नेहा हे पात्र साकारले आहे. या मालिकेमध्ये आपल्याला संकर्षण कराडे हादेखील दिसत आहेत.

संकर्षण कराडे हा या मालिकेतून काही दिवस ब्रेक घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्याच्या नाटकाचे प्रयोग आता सुरू होणार आहेत. त्यामुळे तो मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेमध्ये इतर भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. यामध्ये, घारतोंडे ही भूमिका ही प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

तर या मालिकेमध्ये सिमी चौधरी हिने नकारात्मक भूमिका साकारली आहे. सीम्मी चौधरी हिला घारतोंडे हा नेहमीच कंपनीच्या अफरातफर कामामध्ये मदत करत असतो. त्यामुळे तो तिची नेहमीच बाजू घेत असतो. या मालिकेचे कथानक आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.

मात्र अनेक मालिकेचे कथानक हे आता सध्या एकसारखे दाखवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक हे मालिकांवर चिडलेले दिसत आहेत. कारण एका मालिकेचे कथानक दुसऱ्या मालिकेत दाखवल्याने अनेक प्रेक्षक नाराज होतात. सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सुरू आहे.

या मालिकेत सध्या गौरी ही दुसऱ्या वेशात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षक हे चांगले संतापल्याचे दाखवण्यात येत आहे. तर दुसरीकडे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे कथानक दाखवण्यात येत असल्याने प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत. आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये नेहा हिचा अपघात झाल्यानंतर ती एका नव्या रूपात दाखवण्यात येत आहे.

ती आता ग्लॅमरस रूपामध्ये दिसणार आहे. आधी नेहा साधी भोळी दाखवण्यात आली होती. मात्र, तिचे बदललेले रूप हे प्रेक्षकांना भावले नाही आणि अनेक जण सध्या या मालिकेवर टीका करताना दिसत आहेत. कारण एका मालिकेची कथा ही दुसऱ्या मालिकेत दाखवण्यात येत आहे असे प्रेक्षक म्हणत आहेत. तुम्हाला दुसरी कथा सुचत नाही का? तुम्हाला काही अक्कल आहे का? तुम्ही कसेही कथा लिहितात का अशी टीका आता प्रेक्षक करत आहेत.

एकूणच काय तर प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांच्या मालिकेवर आता प्रेक्षक नाराज झाल्याचे दिसत आहेत. तर आपल्याला याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral