गौरीवर जबरदस्ती, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला धक्कादायक वळण

गौरीवर जबरदस्ती, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला धक्कादायक वळण

स्टार प्रवाह या वाहिनीवर अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र यामध्ये आई कुठे काय करते आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका प्रेक्षकांच्या आवडतीचा बनलेल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देखील आता रंजक घटना-घडामोडी होताना दिसत आहेत.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांच्या प्रेम संबंधावर आधारित ही मालिका दाखवण्यात आलेली आहे. मात्र, आता मालिकेमध्ये नवीन वळण येताना दिसत आहे. जयदीप हा गौरी हिला डोंगरावरून ढकलून देतो, हा भाग आपण पाहिलाच आहे. मात्र, आता मालिकेत एक नवे वळण आल्याचे दाखवण्यात येत आहे.

या मालिकेमध्ये माई ही भूमिका अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी साकारली आहे. वर्षा उसगावकर यांनी अनेक वर्षानंतर ही मालिका स्वीकारली आहे. वर्षा उसगावकर आता सुख म्हणजे नक्की काय असतं या सोबतच सारखं काहीतरी होतय या प्रशांत दामले यांच्या नाटकातही त्या दिसणार आहेत.

यासाठी त्या 36 वर्षानंतर प्रशांत यांच्यासोबत काम करत आहेत. त्यामुळे या नाटका कडून देखील त्यांना खूप अशा अपेक्षा असल्याचे सांगण्यात येते. वर्षा उसगावकर यांच्या सोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपल्याला माधवी निमकर ही अभिनेत्री देखील दिसली आहे.

माधवी निमकर या मालिकेत शालिनी हे पात्र अतिशय जबरदस्त रित्या साकारले आहे. तिचे हे पात्र नकारात्मक असले तरी तिला प्रेक्षकांची चांगली कौतुकाची थाप मिळत आहे. त्यामुळे तिचा उत्साह हा खूप वाढला आहे, तर जयदीप याची भूमिका या मालिकेमध्ये मंदार जाधव याने साकारली आहे

मंदार जाधव हा अतिशय चांगला अभिनेता असून त्याने याआधी देखील अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. या जोरावर या मालिकेमध्ये गौरीची भूमिका गिरीजा प्रभू या अभिनेत्रीने साकारली आहे. या मालिकेचे निर्माते महेश कोठारे आहेत. त्यामुळे या मालिकेकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत.

गेल्या काही दिवसापासून ही मालिका भरकटताना दिसत असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे अनेक जण ही मालिका बंद करा, अशी मागणी देखील करताना दिसत आहेत. आता मालिकेबाबत चा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या प्रोमोमध्ये जयदीप हा गौरीवर जबरदस्ती करताना दिसत आहे.

तर गौरी त्याला विरोध करताना दिसते आणि माई यांना जाऊन सांगते की, जयदीप याने माझ्यावर जबरदस्ती केलेली आहे. मात्र गौरी हिला माहित नसते. अनिल याने जयदीप त्याचे रूप घेतले आहे. तोच गौरीशी अशी जबरदस्ती करतो. मात्र गौरी हिला ही बाब माहित नसते. तिकडून जयदीप हा बाहेरून येतो आणि त्याला गौरी आपल्यावर असा आरोप लावत आहे हे पाहून आश्चर्य वाटते आणि माईला तो सांगतो की, मी असे काही केले नाही.

मात्र माई त्याचे काहीही न ऐकता त्याला झापून काढतात. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे.

Team Hou De Viral