या अभिनेत्रीला ओळखले का? या प्रसिद्ध अभिनेत्याची आहे बायको.. अहिल्याबाई होळकर मालिकेत करत आहे काम…

या अभिनेत्रीला ओळखले का? या प्रसिद्ध अभिनेत्याची आहे बायको.. अहिल्याबाई होळकर मालिकेत करत आहे काम…

गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रदर्शित होत असतात. मात्र, काही वर्षापासून कौटुंबिक मालिकांनी वेगळी उंची गाठलेली आहे. तसेच ऐतिहासिक मालिका देखील मोठ्या प्रमाणात छोट्या पडद्यावर येताना दिसताहेत. ऐतिहासिक मालिकांना देखील मागणी वाढताना दिसत आहे.

मात्र, असे असले तरी काही मालिका या टीआरपी मिळत नसल्याने बंद करण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली होती. तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावरील मालिका देखील छोट्या पडद्यावर चालू होती. मात्र, आवश्यक टीआरपी न मिळाल्यामुळे ही मालिका बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते.

प्रसिद्ध विचारवंत हरी नरके यांनी याबाबत आवाजही उठवला होता. तसेच छगन भुजबळ यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि ही मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता ही मालिका पुन्हा सुरू होते की नाही हे पाहावे लागेल. छोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षापासून पारंपारिक मालिका सोडून इतर मालिका मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत आहेत.

स्वामिनी ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेवर पेशव्यांचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे. रमा माधव यांचा इतिहास यामधे दाखवण्यात आलेला आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना या मालिकेचा वेळ देखील बदलण्यात आलेला आहे. याचे कारण काही कळू शकले नाही. त्यामुळे मालिकेचा टीआरपी हा आवश्यक असल्याचे सांगण्यात येत होते.

तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर देखील गेल्या काही वर्षात अनेक मालिका येऊन गेल्या आहेत. तसेच चित्रपट काढण्याकडे देखील अनेकांचा कल दिसत आहे.सध्या सोनी टीव्हीवर अहिल्याबाई होळकर यांच्या वरील मालिका सुरू आहे. ही मालिका हिंदी मध्ये सुरू आहे. ही मालिका चांगली चालत आहे. या मालिकेमध्ये मराठीमधील अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे. असे असले तरी ही मालिका हिंदी सुरू आहे.

हे विशेष. आज आम्ही आपल्याला या मालिकेतील कलावंत या विषयी माहिती देणार आहोत. या मालिकेमध्ये राजेश शृंगारपुरे, आदिती जलतरे, स्नेहलता वसईकर यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. राजेश शृंगारपुरे हा अनेक चित्रपटात दिसला आहे. राजेश शृंगारपुरे याने झेंडा या चित्रपटात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपट आले होते.

राम गोपाल वर्माच्या सरकार या चित्रपटात देखील त्याने काम केले होते. या चित्रपटातील भूमिका खूप गाजली होती. आता तो अहिल्याबाई होळकर या मालिकेत देखील चांगले काम करत आहे. त्याच्या भूमिकेची खूप चर्चा होत आहे. आज आम्ही आपल्याला या मालिकेतील एका वेगळ्या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

या अभिनेत्रीचे नाव आहे सुखदा खांडकेकर ही प्रसिद्ध अभिनेता आणि माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजित खांडकेकर याची बायको आहे. अभिजीत प्रमाणे त्याची बायको देखील अनेक मालिकांमधून चमकत असते. तिने अनेक मालिकेतून काम केलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेमध्ये तिने द्वारकाबाई ची भूमिका साकारलेली आहे. ही भूमिका अनेकांना पसंत पडत आहे.

तसेच तिचे कौतुक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. आधी सुखदाने बाजीराव मस्तानी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिची भूमिका खूप चाललेली आहे आणि तिला खूप पसंती देखील मिळाली आहे. त्यानंतर तिचा अन् सेन्सॉर हा शो देखील मोठ्या प्रमाणात चालतो.तसेच तिने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

हीच तर प्रेमाची गंमत आहे या मालिकेत देखील ती दिसली होती. तसेच सेक्सपियर म्हातारा या नाटकात देखील ती दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे चित्रपट मालिकांचे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अहिल्याबाई होळकर मधील तिची भूमिका चांगली चालत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral