‘पाडाला पिकलाय आंबा’ अजरामर करणाऱ्या गायिकाचे दुःखद निधन

‘पाडाला पिकलाय आंबा’ अजरामर करणाऱ्या गायिकाचे दुःखद निधन

आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाने मराठी मनोरंजन विश्वाला गाजवून सोडणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी निधन झाले. दहा डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी हे जग सोडले. सुलोचना चव्हाण यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक आजारावर गाणी दिलेले आहेत. त्यांचे हे योगदान कोणीही विसरू शकत नाही.

सोळावं वरीस धोक्याचं, तुझ्या उसाला लागलाय कोल्हा, आंबा आलाय पाडाला, पावना पुण्याचा आलाय ग, अशा शेकडो लावण्या गाणाऱ्या सुलोचना चव्हाण आपल्यामध्ये आज नाही ते ऐकून अनेकांना दुःखद वाटले. संगीत क्षेत्रामधील एक बुलंद आवाज सुलोचना चव्हाण यांच्या रूपाने आपण आज गमावला आहे. भारत सरकारने त्यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केले होते.

त्या वेळेस त्यांना इतर पुरस्कार देखील मिळाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना आजाराचा सामना करावा लागला होता. भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कार सोहळ्यामध्येच त्यांना व्हीलचेअर वरून आणण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी त्या घरातच पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या कमरेचे हार हाड बोलले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

पण त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. उपचारादरम्यान त्या सकारात्मक प्रतिसाद देत नव्हत्या. वयोमानामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात अडचणी निर्माण येत होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खूप नाजूक बनली होती. त्यांची स्मृती देखील कमजोर झाली होती, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने घरी पाठवले होते. अखेर शनिवारी मुंबईतील गिरगाव येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

Sulochana Chavan

याबाबत त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे. एकूणच काय सुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर अवघी मराठी चित्रपट सृष्टी हादरली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली आहे. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोलाचा दगड आपण गमावला आहे. असेच रसिक प्रेक्षक म्हणत आहेत. सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण आदरांजली…

Team Hou De Viral