‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील ‘लतिका’ झाली भावूक, नेमकं काय घडलंय

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील ‘लतिका’ झाली भावूक, नेमकं काय घडलंय

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका लतिका हिच्यामुळे चांगलीच गाजत आहेत. या मालिकेमध्ये लतिका हिने जबरदस्त अशी भूमिका केली आहे. या मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक हिने साकारली आहे, तर या मालिकेत अभ्याची भूमिका देखील जबरदस्त अशी झालेली आहे.

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये अभ्याची भूमिका ही अभिनेता समीर परांजपे याने साकारली आहे. समीर परांजपे अधिक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने देखील अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. अक्षया नाईक आणि अभ्याची प्रेम कहानी या मालिकेत फारच लोकप्रिय झाल्याचे दिसत आहे.

ही मालिका आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. त्या मालिकेला सुरू होऊन जवळपास दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना आता दिसत आहे.या मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये आपण असे पाहिले आहे की श्रद्धांजलीपर कार्यक्रमामध्ये काकासाहेब हे येतात, तर त्यावेळेस दौलत हा तेथे रडत असतो.

त्यानंतर आबासाहेब काकासाहेब यांना घेऊन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात येतात तर दुसरीकडे अभ्या आणि लतिका गाडीवर बसून जात असते. तेवढ्यातची दौलत माणसं त्याला पाहत असतात. मात्र, त्यावेळेस लतिका हिने बुरखा घातलेला असतो आणि अभयाने हेल्मेट घातले असते. त्यामुळे ते कोणालाही ओळखू येत नाहीत, असा आता या मालिकेचा ट्रॅक पुढे पुढे सरकत आहे. तशी देखील ही मालिका पुढे जाताना दिसत आहे.

लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ यामध्ये शेअर करत असते. तिच्या या सोशल मीडियावरील अकाउंटला लाखो लोकांनी फॉलो केले आहे. आतादेखील तिने एक नुकताच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ नक्की काय आहे ते बघू. काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी वरचा गौरव सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये अक्षय हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अक्षया हिला याआधी देखील एक पुरस्कार मिळाले आहेत. या वेळेस ती अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुरस्कार मिळाल्याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आणि एक व्हिडिओ देखने शेअर केला. यामध्ये ती भावूक झाल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्यांदा कलर्स मराठी वरचा लोकप्रिय अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ही भूमिका साकारणे सोपे नव्हते. पण मला सतत आमच्या टीमचा पाठिंबा होता. आज खरंच शब्द कमी पडतात.

पण इतकच म्हणेन की, तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाच्या बदली मी फक्त आभार मानून यापुढे प्रामाणिकपणे काम करत राहील, असे तिने म्हटले आहे. तर आपल्याला सुंदरा मनामध्ये भरली मालिका आवडते नक्की सांगा.

Team Hou De Viral