लतिकाला सापडलं हेंद्रीच सीसीटीव्ही फुटेज, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत नवीन वळण..

लतिकाला सापडलं हेंद्रीच सीसीटीव्ही फुटेज, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत नवीन वळण..

गेल्या दोन वर्षापासून सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांची चांगली मनोरंजन करत आहे. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेमध्ये लतिका आणि अभ्या यांची कहाणी दाखवण्यात आली आहे, तर येणाऱ्या भागांमध्ये अतिशय रंजक घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

आता येणाऱ्या भागात आपण असे पाहणार आहोत की, अभ्या याच्या केसचा निकाल लागणार आहे. अभ्या आणि हेन्द्री सोबत त्या रात्री नेमकं काय घडलं हा पुरावा या प्रकरणात महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड असतात. त्यामुळे हे सीसीटीव्ही फुटेज अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे.

आणि आता हेच सीसीटीव्ही फुटेज कोर्टामध्ये सादर होणार आहे. यातूनच अभ्या हा लवकरच निर्दोष सुटणार आहे. यामध्ये देखील असे दिसणार आहे की, अक्का साहेबांनी दौलत आणि आबा याच बोलणं ऐकलं असतं आणि दोघेही सीसीटीव्ही फुटेज बद्दल बोलत असतात. या दोघांचा संभाषण आक्का साहेबांनी लतिकाला जाऊन सांगितलेलं असतं.

तर लतिका मग हे सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यासाठी पुढाकार घेते, तर दुसरीकडे दौलत आणि हेंद्रीला काही समजत नसतं आणि हे दोघेही विवेक याच्यावर संशय घेत असतात. मात्र, दुसरीकडे अभिलाशा ही विवेकाला भेटायला जाते, त्यावेळेस विवेक याच्या बोलण्यात खूप आत्मविश्वासाने वाढलेला दिसत आहे. त्यामुळे तिला देखील संशय यायला लागतो.

अभिलाषा ही दौलतला जाऊन सांगते की, विवेक असा बोलला. त्यावर दौलत म्हणतो की, आता आपल्याला विवेक यालाच उचलायला हवे. तर आता दुसरीकडे अभ्या आणि लतिका दोघेही हे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे अभिलाषा हिने सीसीटीव्ही फुटेज हे रेकॉर्ड करून आपल्या लॅपटॉपमध्ये देखील ठेवले आहे आणि मुख्य चित्रीकरण आपल्याकडे ठेवले आहे.

दौलतने अभिलाषा हिला पहिल्यांदा सांगितले होते की, असे कुठलेही सीसीटीव्ही फुटेज आपल्याला नको आहे. मात्र, अभिलाषा ही चूक करते आणि यातूनच आता अभ्या याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे. आगामी भागामध्ये आपण सुंदर मनामध्ये भरली या मालिकेत हे सर्व काही पाहणार आहोत. त्यानंतर अभ्याची निर्दोष मुक्तता होते.

त्यानंतरही मालिका सुरू राहते की आणखी काही पुढे भाग दाखवण्यात येतात हे आपल्याला येणाऱ्या काही भागातच कळणार आहे, तर आपल्याला सुंदर मनामध्ये भरली मालिका आवडते का? या मालिकेतील सर्वाधिक भूमिका आपल्याला कुठली आवडली आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral