ह्या कॉमेडी कलाकाराची वाईट अवस्था, रस्त्यावर कांदे, बटाटे विकायची वेळ

ह्या कॉमेडी कलाकाराची वाईट अवस्था, रस्त्यावर कांदे, बटाटे विकायची वेळ

गजनी या चित्रपटात एक छोटी भूमिका आपल्याला आठवत असेल ती म्हणजे असीन हिच्या मित्राची. ही भूमिका सुनील ग्रोवर याने साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि ही भूमिका चर्चेत देखील खूप मोठ्या प्रमाणात राहिली होती. सुनील ग्रोवर याने कपिल शर्मा सोबत देखील शोमध्ये काम केले.

कित्ती, डॉक्टर गुलाटी यासारख्या भूमिका त्याने अतिशय लोकप्रिय केल्या. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला ओळखले जाते. सुनील ग्रोवर हा अनेकदा स्टेज शो देखील करतो. अनेक ठिकाणी त्याला बोलवण्यात येते. त्यामुळे ते तिकडे जातात देखील. यासाठी त्याला चांगले मानधन देखील देण्यात येते. सुनील ग्रोवर याचा मध्यंतरी कपिल शर्मा याच्या सोबत वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी हा शो सोडला होता.

मात्र त्यानंतर या दोघांनी पुन्हा एकदा आपसातील मतभेद संपवून हा शो पुन्हा एकत्रितरित्या सुरू केला होता. आता सुनील ग्रोवर पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. सुनील ग्रोवर हा रस्त्यावर बटाटे आणि कांदे विकताना दिसत आहे.

अधिक चौकशी केली असता त्याच्या एका चित्रपटाची चित्रीकरण सुरू असून त्यासाठी हे त्यांनी सगळं काही केले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या पोस्टवरून त्याला अनेकांनी ट्रोल केले आहे. तुझ्यावर आता बटाटे विकण्याची वेळ आली का? असे अनेकांनी म्हटले आहे. तू कांदे विकण्याच्या लायकीचाच आहेस, असे अनेकांनी म्हटले आहे, तर कपिल शर्माच्या शोमध्ये तुला जागा भेटत नाही का? असेही अनेकांनी म्हटले आहे.

एकूणच काय तर सुनील ग्रोवर याला या फोटोवरून अनेकांनी ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे.

Team Hou De Viral