सुनील शेट्टी ची बायको आहे बॉलिवूड मधील ‘अंबानी’; स्वतः सांभाळते कोट्यवधी रुपयांचा बिझनेस

सुनील शेट्टी ची बायको आहे बॉलिवूड मधील ‘अंबानी’; स्वतः सांभाळते कोट्यवधी रुपयांचा बिझनेस

बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकामध्ये सुनील शेट्टी हा अभिनेता आला. सुनील शेट्टी यांनी बलवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. खडा आवाज, जबरदस्त देहयष्टी असलेला हा अभिनेता दिसायला हा जेमतेम होता. असे असले तरी त्याने बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळवले.

मात्र सध्याच्या काळामध्ये सुनील शेट्टी हा बॉलिवूडमध्ये फारसा सक्रिय नसला तरी तो आपले कोट्यवधी रुपयांचे व्यवसाय सांभाळत असतो. सुनील शेट्टी याच्याकडे बरेच हॉटेल देखील आहेत. सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी हिने देखील काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, तिला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.

त्यामुळे आता ती मिळेल तो चित्रपट करत असल्याचे दिसत आहे. सुनील शेट्टी यांची पत्नी मना ही देखील उद्योगपती आहे. 90 च्या दशकात सुनील शेट्टी यांनी अजय देवगन, अक्षय कुमार यांच्या सोबत मिळून अनेक चित्रपटात काम केले होते. या त्रिकुटाचा अनेक चित्रपट हिट झाले. मात्र सुनील शेट्टी याला बलवान, गोपीकिशन यासारख्या चित्रपटांमधून वेगळी ओळख मिळाली.

तसेच त्याचा दिलवाले हा चित्रपट खूप गाजला. 2000 मध्ये सुनील शेट्टी यांच्या धडकन या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी हे प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यानंतर सुनील शेट्टी यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र, त्याला हवे तसे यश मिळालेच नाही.

सुनील शेट्टी यांची पत्नी हे देखील कायमच चर्चेत असते. सूनील शेट्टी यांचे चित्रपट शिवाय हॉटेल देखील आहेत. बॉलीवूडमध्ये कलाकार हे कायमच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यासाठी ओळखली जातात. सुनील शेट्टी यांची पत्नी माना शेट्टी हिला बॉलिवूडमधील लेडी अंबानी असे म्हटले जाते. याचे कारणही तसेच आहे.

कारण ती कोट्यवधी रुपयांची व्यवसाय सांभाळत असते. माना ही बिझनेसवुमन असून तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. माना आणि सुनील शेट्टी यांनी मिळून रियल इस्टेटमधील प्रोजेक्ट सुरू केला होता. या प्रोजेक्टमुळे मुंबईत 21 लक्झरी आपारमेंट उभारले आहेत. यात माना शेट्टीची देखील खूप मोठी गुंतवणूक असल्याचे सांगण्यात येते.

माना द सेव चिल्ड्रेन ऑफ इंडिया माध्यमातून गरीब मुलांना मदत करते. माना हिचा सामाजिक क्षेत्रामध्ये देखील याचा खूप मोठा वावर आहे.

Team Hou De Viral