तैमूरसारखा हुबेहुब दिसतो सनी लिओनीचा मुलगा, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

तैमूरसारखा हुबेहुब दिसतो सनी लिओनीचा मुलगा, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

सनी लिओनीने तीन मुलांची आई आहे. तिने सगळ्यात आधी मुलगी निशाला दत्तक घेतलं. त्यानंतर सनी आणि डॅनियल सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले. सनीच्या जुळ्या मुलांचं नाव नोआ आणि आशेर आहे. या जुळ्या मुलांपैकी एक मुलगा हुबेहुब तैमूर अली खानसारखा दिसतो.

तैमूर अली खानला सर्वात प्रसिद्ध स्टार किड म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्याच्या जन्मापासून ते आतापर्यंत तो कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. दरम्यान, सनीला तिच्या मुलासोबत स्पॉट केल्यावर लोक शॉक झाले. 2018 मध्ये सनी लिओनीच्या जुळ्या नोआ आणि आशेरचा जन्म झाला. त्याचबरोबर, तैमूर अली खानचा जन्म 2016 मध्ये झाला.

याचा अर्थ तैमूर सध्या अशर आणि नोआपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. सनी लिओनीची फिल्मी कारकीर्द सगळ्यात आधी टेलिव्हिजन रिअॅलिटी शो बिग बॉसची स्पर्धक म्हणून सुरू झाली, त्यानंतर तिची फिल्मी कारकीर्द ‘जिस्म 2’ या चित्रपटाने सुरू झाली, ज्याला समीक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पण चित्रपट चांगला चालला.

सुरुवातीच्या काळात तिला बराच संघर्ष करावा लागला कारण ती एक पॉर्न स्टार होती आणि कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शक तिला त्यांच्या चित्रपटात कास्ट करू इच्छित नव्हता. मात्र, एवढं सगळं असूनही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सनी लिओनीवर करणजीत कौर ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे, ज्यात सनीने स्वतः अभिनय केला आहे.

तिच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू या मालिकेत दाखवण्यात आले आहेत.

Team Hou De Viral