‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील या अभिनेत्रीने काढले आहेत खूप हलाखीत दिवस, लोकांच्या घरी…

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील या अभिनेत्रीने काढले आहेत खूप हलाखीत दिवस, लोकांच्या घरी…

बॉलीवुड तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे अभिनेता व अभिनेत्री आहेत की, ज्यांना अतिशय काबाडकष्ट करून बॉलिवूडमध्ये आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले नाव कमवावे लागले आहे. देव माणूस या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण एसीपी दिव्या सिंह ही भूमिका पाहिली आहे.

एसीपी दिव्या सिंह भूमिका केलेली अभिनेत्री नेहा खान हिने देखील तिच्या आयुष्यात अनेक कष्ट उपसले आहेत. लोकांच्या घरची तिने देखील भांडे घासले असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे ती म्हशीचे दूध काढून विकायची, असे देखील तिने अनेकदा इंटरव्यू मध्ये सांगितले आहे. मराठीमध्ये अजूनही आणखी काही कलाकार आहेत. यांनादेखील अशा कष्टांना सामोरे जावे लागले आहे.

यामध्ये आपल्याला दिग्गज अभिनेत्यांची नावे देखील घेता येतील. आता देखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये एक अशी अभिनेत्री आहे की, तिने अतिशय खडतर जीवन जगले आहे आणि आता मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. ठिपक्यांची रांगोळी मधील ही अभिनेत्री आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकी कोण आहे ही अभिनेत्री.

ठिपक्यांची रांगोळी मधील एका अभिनेत्रीने हलाखीत स्वतःचे दिवस काढले आहेत. अगदी लोकांच्या घरी धुणीभांडी केली आहेत. ही अभिनेत्री म्हणजे मालिकेतील माधुरी कानिटकर. म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पाठारे. सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या बालपणी आणि करियरच्या सुरुवातीला खूप कष्ट केले आहेत. अगदी लोकांची भांडी देखील घासली आहेत. हो हे खर आहे.

अर्चना नेवरेकर आणि सुप्रिया पाठारे या दोघी बहिणी अभिनेत्री आहेत. सुप्रिया यांची मैत्रीण वेदांती मेहेंदळे या रचना पालेकर यांच्याकडे भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण घ्यायला जात असे. त्यावेळी डान्सची महिनाभराची फी होती सत्तर रुपये. आणि सुप्रिया यांनी आईला सांगितलं तर आपल्याला सत्तर रुपये देणार नाही हे सुप्रिया यांना माहित होतं.

त्यामुळे सुप्रिया यांनी डान्स क्लास फी स्वतः भरण्याचं ठरवलं. त्यामुळे अभिनेत्री सुप्रिया यांनी आपली मैत्रीण वेदांती मेहेंदळेच्या घरी महिनाभर भांडी घासण्याचे काम केलं. या कामाचे त्यांना शंभर रुपये मिळायचे. त्यातील 70 रुपये सुप्रिया पाठारे डान्स क्लास घायच्या आणि उरलेले तीस रुपये आईला घरी द्यायच्या.

सुप्रिया त्यांच्या आई सोबत पंधरापेक्षा जास्त घराची भांडी घासायच्या, असा खडतर प्रवास करत अभिनेत्री सुप्रिया पाठारे आजपर्यंत वर पोहोचल्या आहेत, तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आणि ठिपक्यांची रांगोळी मधील माधवीच्या भूमिकेतील त्यांचा अभिनय तुम्हाला आवडतो का? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.

Team Hou De Viral