खोट्या आरोपानंतर माझी पत्नी… सुरज पवार सोबत घडली दुःखद घटना ?

काही वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट आपण पाहिला असेल. सैराट चित्रपटामध्ये आर्ची हिच्या भावाची भूमिका साकारणारा प्रिन्स हा सगळ्यांचा लक्षात होता. प्रिन्स ही भूमिका अभिनेता सुरज पवार याने केली होती. सुरज पवार याने याआधी देखील नागराज मंजुळे यांच्या काही लघुपटातही काम केले होते.
सुरज पवार याने पिस्तुल्या लघुपटातही काम केले होते. त्याचा हा लघुपट प्रचंड चालला होता. त्यानंतर त्याने फॅन्ड्री चित्रपटातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. मात्र त्याला खऱ्या अर्थाने सैराट या चित्रपटाने ओळख मिळवून दिली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. सैराट चित्रपटातील त्याची भूमिका लोक प्रिय ठरली होती.
त्यांनी साकारलेल्या प्रिन्स हा सगळ्यांच्याच लक्षात राहिला होता. त्यानंतर त्याला काही चित्रपटाच्या ऑफरही आ. मात्र त्याने अपेक्षित यश संपादन केले नाही. मध्यंतरी त्याचे नाव एका प्रकरणात आले होते. या प्रकरणात प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणात बातम्या देखील छापून आल्या होत्या. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडियात देखील याबाबतच्या बातमी दाखवण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी याबाबत गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र, आता सुरज पवार याने तक्रारीचा पाढा वाचला आहे. सुरज पवार याने सांगितले आहे की, मी असे काही केले नव्हते. माझी नाहक बदनामी करण्यात आली. त्यामुळे मला बदनाम करणाऱ्यावर मी आता मानहानीचा ठोकावा का? असे त्याने म्हटले आहे, तर त्याने सोशल मीडियात नेमकं काय म्हटल आहे, चला जाणून घेऊया..
नमस्कार मी सुरज पवार. गेल्या दहा-पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली किंवा बदनामी केली, असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही. सगळ्याच मीडियाने माझं एवढं धिंडवडे काढले तरी पण मी शांत होतो, अखेर मी स्वतः राहुरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलिसांसमोर सर्व कागदपत्र सादर केले. माझे म्हणणे देखील सादर केले.
त्यानंतर वेळोवेळी राहुरी पोलीस सांगेल, त्या दिवशी हजर राहत होतो. पोलीस स्टेशनला पहिल्यांदा हजर राहिलो आणि बाहेर मीडियात प्रिन्सला पोलिसांनी अटक केली. प्रिन्स खाणार जेलची हवा. प्रिन्स अखेर जेलबंद.. अशा मथळ्याखाली बातम्या देऊन प्रिंट आणि डिजिटल मीडियाने कुठलीही शहानिशा न करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं.
खरे पाहता राहुरी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादी आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहिलं होतं. परंतु प्रत्यक्षात ते मला कधीच भेटले नव्हते, असे सुरज पवार याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.