चेहऱ्यावरील ‘सुरकुत्या’ घालवण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा करून पहाच.. नक्कीच आपल्याला फरक जाणवेल…

चेहऱ्यावरील ‘सुरकुत्या’ घालवण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा करून पहाच..  नक्कीच आपल्याला फरक जाणवेल…

वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या देखील मोठ्या प्रमाणात पडत असतात. मात्र, काही वयोवृद्ध आपण पाहिले असल्यास त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या अजिबात दिसत नाही. त्याचे कारण देखील ते योग्य आहार आणि व्यायाम करून आपला चेहरा टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करतात.

चेहऱ्यावर इतर प्रकारचे मालिश करून देखील आपला चेहरा टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र, अनेक तरुणांना सध्या तिशीच्या आतच चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आणि म्हातारी सारखे दिसत आहेत. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशी काही घरगुती उपाय सांगणार आहोत की, हे उपाय करून आपण आपला चेहरा तजेल आणि टवटवीत ठेवू शकता.

1) नारळ दूध : नारळाच्या दूधामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे हे नारळाचे दूध अतिशय उपयुक्त मानले जाते. जर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर आपण नारळाच्या दुधाचा उपयोग करू शकता. नारळाचे दूध एका कपामध्ये घेऊन कापसाच्या सहाय्याने ते चेहऱ्यावर लावावे. चेहऱ्यावर लावल्यानंतर अर्धा तास चेहर्‍यावर ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवावा. काही आठवडे असा प्रयोग करावा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

2) केळ आणि मध : केळ व मध हा असा पदार्थ आहे की, सर्वसामान्यांच्या घरात हा पदार्थ कधीही उपलब्ध होऊ शकतो. केळ आणि मधामध्ये मोठे औषधी गुणधर्म असतात. केळ आणि मधाचे एकत्रित कालवण करून घ्यावे आणि हे कालवण आपल्या चेहर्‍यावर लावावे. काही जणांना हे किळसवाणी वाटेल. मात्र, असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी नक्कीच मदत मिळते.

3) बटाटा : बटाटा हा सर्वत्र उपलब्ध असतो. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्याची समस्या असल्यास अर्धा बटाटा कापून तो चेहऱ्यावर घासावा. काही वेळ तो तसाच ठेवावा व त्यानंतर चेहरा धुऊन घ्यावा, असा प्रयोग काही आठवडे करा व त्यानंतर आपल्या चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास नक्कीच मदत होते.

4) मध : मध हा नैसर्गिक स्त्रोतापासून बनलेला असतो. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. तर आपल्याल सूरुकुत्या समस्या असेल तर आपण चेहऱ्यावर मधाचा लेप लावावा. काही वेळ ठेवावा आणि त्यानंतर चेहरा धुऊन टाकावा. त्यानंतर ही समस्या नक्कीच कमी होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral