‘मी कोणाच्याही दबावाखाली…’, प्लेअर ऑफ द सिरीज होताच सुर्यकुमारला आला गर्व, रोहित-राहुल बाबत केलं धक्कादायक वक्तव्य

‘मी कोणाच्याही दबावाखाली…’, प्लेअर ऑफ द सिरीज होताच सुर्यकुमारला आला गर्व, रोहित-राहुल बाबत केलं धक्कादायक वक्तव्य

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना पावसामुळे टाय झाला. टीम इंडियाचा स्टार मिडल ऑर्डर बॅट्समन सूर्यकुमार यादव याला या मालिकेतील चमकदार कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला आहे.

त्याने या मालिकेत सर्वाधिक 124 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 200 च्या पुढे गेला आहे. पुरस्कार सादरीकरणा दरम्यान सूर्याने सिराजचे कौतुक केले आणि टीम इंडियाच्या योजनेबद्दल सांगितले. त्याचबरोबर त्याने या मालिकेतील चांगल्या कामगिरीबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.

टीम इंडियाच्या मिस्टर 360 डिग्री सूर्यकुमार यादवने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 111 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याचबरोबर या मालिकेतील उत्तम कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा किताबही देण्यात आला.

त्याने सिराजसोबतच टीम इंडियाचेही कौतुक केले आहे. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला,

“आतापर्यंत ज्या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे, मला इथे पूर्ण खेळ करायला आवडले असते आणि सिराजने म्हटल्याप्रमाणे हवामान आमच्या हातात नाही. दडपण नेहमीच असते पण मी ते गृहीत धरत नाही आणि त्याचवेळी मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे, मी फक्त मैदानावर येऊन व्यक्त होत आहे.

मी कोणत्याही प्रकारचे दडपण घेत नाही, माझा हेतू आणि दृष्टिकोन स्पष्ट असेल. आम्ही फक्त बाहेर जाऊन स्वतःला व्यक्त करू शकतो, पूर्ण सामना छान झाला असता, पण तेही ठीक आहे.”

Team Hou De Viral