सुशांतच्या स्मरणार्थ सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने उचलले हे पाऊल !

सुशांतच्या स्मरणार्थ सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने उचलले हे पाऊल !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला खूप मोठा धक्का बसला आहे. भलेही त्यांचे ब्रेकअप झाले होते पण अद्याप तिच्या मनात सुशांतसाठी जागा होती.

अंकिता व सुशांत पवित्र रिश्ता मालिकेतून खूप लोकप्रिय झाले होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते भेटले आणि दोघांचे प्रेम जुळले होते. आता असं समजतंय की अंकिताने पवित्र रिश्ताच्या सीक्वलसाठी एकता कपूरसोबत बोलणे केले आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेने एकता कपूरसोबत पवित्र रिश्ता मालिकेच्या सीक्वलबद्दल बातचीत केली आहे. हा शो सुशांतसाठी खूप स्पेशल होता.अंकिता व एकता या शोच्या सीक्वलच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली देऊ इच्छित आहेत.

नुकतेच एकता कपूरनेही सुशांतच्या स्मरणार्थ मोठी घोषणा केली होती. तिने सुशांतला श्रद्धांजली देत मेंटल हेल्थ अवरनेससाठी पवित्र रिश्ता नावाने फंड सुरू करणार असल्याचे सांगितले होते. या फंडच्या माध्यमातून लोकांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल जनजागृती केली जाणार आहे.याबद्दल एकता कपूर म्हणाली होती की, मागील दहा वर्षांत खूप काही बदलले आहे.

आज प्रत्येक गोष्टीचा खूप दबाव असतो. अशा महारोगराईत आपण सगळे घरात बंदिस्त झालो आहोत. आपल्या सगळ्यांना तणाव व बैचेनीचा सामना करावा लागतो आहे. काम, घर, नोकरी गेल्यामुळे आपला तणाव वाढत चालला आहे.

याच कारणामुळे कित्येक लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.पवित्र रिश्ता फंडचा हिस्सा बनून मी खूश आहे आणि पुढेही अशाच प्रकारच्या उपक्रमात सामील राहून खूश राहेन.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral