आपल्या पश्चात ‘एवढी’ संपत्ती सोडून गेला सुशांत सिंग राजपूत, वाचून धक्का बसेल !

आपल्या पश्चात ‘एवढी’ संपत्ती सोडून गेला सुशांत सिंग राजपूत, वाचून धक्का बसेल !

उत्तम अभिनयाच्या जोरावर टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत स्वत:ची छाप पाडणारा अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने घरात ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. नेहमी आनंदी राहणाऱ्या सुशांतच्या सहकारी कलाकारांव्यतिरिक्त, सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*ची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. त्याच्या मृ*त्यू*च्या वृत्तावर सुरुवातीला कोणीच विश्वास ठेवला नाही.

त्याच्या आ*त्म*ह*त्ये*ची माहिती त्याच्या नोकराने पोलिसांना दिली. ज्याने आजवर आपल्या कारकीर्दीत एवढे चित्रपट करून ही यश मिळाले नाही तेवढे यश कमी चित्रपटांतून सुशांतला मिळाले. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

‘एमएस धोनी’ने केली 220 कोटींची कमाई

सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला अभिनेताच नाही तर एक उत्तम डान्सर आणि टीव्ही होस्ट देखील होता. एका चित्रपटासाठी तो 5 ते 7 कोटी रुपये मानधन घेत होता. त्याचवेळी जाहिरातीसाठी 1 कोटी रुपयाचे मानधन घेत होता. त्याने अनेक रियल इस्टेट प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक केली.

त्याची एकूण मालमत्ता 80 लाख डॉलर्स म्हणजेच 60 कोटी रुपयापेक्षा अधिक आहे. त्याच्या एमएस धोनी चित्रपटाने तब्बल 220 कोटी रुपयांची कमाई केली होती. सुशांतसिंग याने चित्रपट, जाहिरात आणि गुंतवणूकीद्वारे कोट्यावधी रुपये कमावले.

सुशांतकडे मोटारी व दुचाकींचा ताफा

बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींप्रमाणेच सुशांत मुंबईच्या पॉश एरियातील वांद्रेमध्ये एक अलिशान घरात रहात होता. त्याला मोटारी आणि बाईकचे खूप आवडत होत्या. त्याच्याकडे मोटारींचा पूर्ण ताफाही होता. यामध्ये मासेराटी क्वाटरोपोर्ते, लँड रोव्हर, रेंज रोव्हर, एसयूव्ही, बीएमडब्ल्यू 1300 आर मोटारसायकल आणि इतर अनेक गाड्यांचा समावेश आहे.

सुशांतसिंगचा प्रत्येक चित्रपट कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित करत होते. अशा परिस्थितीत त्याचे मानधन देखील सतत वाढत होते. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने बऱ्याच टीव्ही शोमध्येही काम केले होते.

सुशांतने नॅशनल ऑलिम्पियाड ऑफ फिजिक्स देखील जिंकले

21 जानेवारी 1986 रोजी बिहारच्या पटना येथे जन्मलेल्या सुशांतसिंह राजपूत याने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई पो छे’ या पहिल्या चित्रपटातून त्याची एक हुशार अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला.

तो अभ्यासातही खूप हुशार होता. त्याने नॅशनल ऑलिम्पियाड ऑफ फिजिक्स देखील जिंकली होती. अभिनय कारकीर्दीसाठी त्याने अभियांत्रिकीची तीन वर्षे पूर्ण केली. तो दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मध्ये शिकत होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral