जेव्हा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ‘त्या’ अभिनेत्रीला दर 8 तासाला करावे लागत असले काम, एकवेळ तर जोखीम घेऊन केले

दिग्दर्शक पंकज पाराशर यांच्या तुमको ना भुल पाएंगे या चित्रपटाला रिलीज होऊन 19 वर्ष झाले आहेत. हा चित्रपट 22 फेब्रुवारी 2002 ला रिलीज झाला होता.चित्रपटात सलमान खान,सुश्मिता सेन,दिया मिर्जा,इंदर कुमार मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने जास्त कमाई नव्हती केली पण चित्रपटातील गाणे खूप प्रसिद्ध झाले होते.
जर आपण चित्रपटातील स्टार बद्दल केली तर सलमान खान अजूनही चित्रपटसृष्टी मध्ये ऍक्टिव्ह आहे पण सुश्मिताच करिअर काही चांगले नाही राहिलेलं तिला शेवट 2010मध्ये नो प्रॉब्लेम या चित्रपटात पाहिले होते.पण आता ती नुकतीच आर्या या नाव असलेल्या वेब सिरीजद्वारे सगळ्यांच्या समोर आली आहे.
मिस युनिव्हर्स राहिलेली सुश्मिता तिच्या फिटनेसची चांगली काळजी घेते.ती नेहमी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर करत असते. तस पाहिलं तर कमी लोकांना माहिती आहे सुश्मिताच्या आयुष्यात अशी एक वेळ आली होती ती तिच्या आयुष्यातील सर्वात खराब वेळ होती.तिने स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी स्टेरॉयड ची गरज पडली होती.
सुश्मिताला स्टेरॉयड घ्यावा लागलं होतं कारण तिच्या शरीरामध्ये कोर्टिसोल या नावाचं हार्मोन तयार होण बंद झाले होत.तिने एका मूलखतीमध्ये सांगितले होते की तिच्या शरीराचे अवयव एक एक करून काम करणे बंद करत होत
तिने सांगितले होते की तिचा चेहरा फिका पडत होता व तिला जिवंत राहण्यासाठी स्टेरॉयड वर अवलंबून राहावे लागले होते.याचा अर्थ असा की मला हायड्रोकार्टीसोन नावाच औषध सारख सारख घ्यावे लागत होतं.हे औषध प्रत्येकी 8 तासाला घ्यावे लागत होते.
सुश्मिताने सांगितले होते की तिचे केस गळत होते.तिचा चेहरा पिवळा पडत होता.ती खूप अस्वस्थ आजारी होती स्टेरॉयड घेतल्याने वजन देखील वाढत होते.मग तिने तिच्या आजाराशी लढा देण्याचे ठरवले व योगा चालू केली एक वेळ तर तिची परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.नंतर तिने स्वतःला थोडं सांभाळले.
तुमच्या माहितीसाठी की 1994 मध्ये सुश्मिता च्या डोक्यावर मिस युनिव्हर्स चा किताब होता.त्यानंतर तिने 1996 मध्ये बॉलीवूडमध्ये आगमन केले.दस्तक या चित्रपटातुन डेब्यु केल्यानंतर सुश्मिताने जोर,सिर्फ तुम,हिंदुस्थान की कसम,बिवी नं वन,क्यो मै झूठ नही बोलता,आँखे,मै हू ना,मैने प्यार क्यू किया,बेवफा या सारख्या चित्रपटात काम केले.
सुश्मिताने सलमान खान,शाहरुख खान,सनी देओल,अमिताभ बच्चन,अक्षय कुमार,अजय देवगण,अनिल कपूर,मिथुन चक्रवर्ती,या सारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करूनही हवे ते यश ती बॉलीवूड मध्ये प्राप्त करू शकली नाही.
तुमच्या माहितीसाठी की 45 वर्षीय सुश्मिताने अजून देखील लग्न केले नाही.तिने केवळ 24 वर्षाची असताना तिची मोठी मुलगी रिनीला 2000 मध्ये दत्तक घेतले होते.तिच्या या निर्णयामुळे सगळे आश्चर्यचकित झाले होते.त्यानंतर तिने 2010 मध्ये दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतले होते.
तस पाहिलं तर सुश्मिताची लव अफेअर ची यादी खूप मोठी आहे.सध्या ती तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे.रोहमन ला देखील सुश्मिता सोबत राहायला खूप आवडतं.दोघे सोबत असतानाचे फोटो आणि व्हडिओ शेअर करत असतात.