‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ‘चिन्याची’ गर्लफ्रेंडची बघा

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ‘चिन्याची’ गर्लफ्रेंडची बघा

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. मालिकेतील सगळ्याच भूमिका या प्रेक्षकांना खूप आवडतात. मात्र, असे असले तरी या मालिकेमध्ये चीन्याची भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहे. आता मालिकेमध्ये नवीन वळण आल्याचे पहायला मिळत आहे. मालिकेत चीन्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री झाली आहे. गेल्या काही दिवसापासून चीन्या त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलताना दिसला आणि आता तर चक्क तिला घेऊन साळवी कुटुंबात दाखल झाला आहे.

मात्र, तिला‌ पाहून घरच्यांचा गोंधळ उडालेला आहे. मालिकेत चिन्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे सुवेधा देसाई असे आहे. सुवेधा हिने या अगोदर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतून भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने भन्नाट पाञ निभावले होते. गुजराती भाषिक साकरलेले पाञ सगळ्याना आवडले.

तिची धमाल प्रेक्षकांना मात्र खूपच भावली होती. असेच काहीसे पात्र घेऊन ती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत देखील निभावताना दिसणार आहे. वैजू नंबर वन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नुकतीच तिने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये हजेरी लावली होती. समीर चौगुले यांच्या सोबत तिने एक कलाकृती सादर केली होती.

सुवेधा देसाई ही एक युट्युब चॅनेल देखील चालवते. या चैनल वर ती नवनवीन व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या व्हिडिओला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. सुवेधा ‌ही मुंबईत लहानाची मोठी झाली. ठाकूर कॉलेज आर्ट्स अँड सायन्स मधून तिने शिक्षण घेतले होते. या सोबतच तिने एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवला होता.

सुवेधा ही दिल दोस्ती दुनियादारी मालिकेमुळे सुवेधा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली.सुवेधा हिने सागर गावणकर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सागर हे मराठीसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखक म्हणून भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ बनवला‌‌ होता.

त्यात सुवेधा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. आता येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून त्याची गर्लफ्रेंड साकारत आहे. तिच्या येण्याने साळवी कुटुंबात मात्र पुरता गोंधळ उडालेला आहे. तिच्यासोबत चिन्याचे लग्न लावून दिले जाणार का हे येत्या काही दिवसात प्रेक्षकांसमोर येईल. तर आपल्याला सुवेधा देसाई आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Seema