बॉलिवूड हादरलं ! ‘3 इडियट्स’ मधल्या कलाकाराचे झाले दुःखद निधन

बॉलीवूडमध्ये एका मागून एक कलाकार आपल्याला सोडून जात असल्याचे गेल्या काही दिवसापासून आपण पाहिले आहे. ज्येष्ठ कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा नुकताच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने राजू श्रीवास्तव जिम मध्ये कोसळले होते.
त्यानंतर त्यांना रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर 56 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पराग कंसारा या विनोदी कलाकाराचा देखील मृत्यू झाला. आता देखील बॉलीवूडमधील एका ज्येष्ठ अभिनेत्याचा देखील मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
बॉलीवूडमध्ये अतिशय जबरदस्त असणारे अभिनेते अरुण बाली यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईमध्ये निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाली यांनी त्यांचा शेवटचा चित्रपट गुडबाय हा केला होता. विशेष म्हणजे आजच त्यांचा हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. अरुण बाली यांनी अनेक चित्रपटात काम केले.
अमिताभ बच्चन रश्मिका मंदाना यांच्यासोबतचा त्यांचा हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पहावे लागणार आहे. गुडबाय चित्रपटाकडून अनेकांना अपेक्षा आहेत. बाली यांनी स्वाभिमान या अतिशय गाजलेल्या मालिकेमध्ये काम केले होते. त्याचप्रमाणे थ्री इडियट्स या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका प्रचंड गाजली होती.
बाली यांचा मुलगा अंकुश याने सांगितले की, त्याच्या वडिलांना मायस्थेनिया ग्रेवीस या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मेरे पिता हमे छोडके गये, असे त्याच्या मुलाने सांगितले आहे. बाली यांनी अनेक चित्रपटात काम केले होते.
शाहरुख खानच्या एका चित्रपटातही त्यांनी काम केले होते. चाणक्य, स्वाभिमान, देश से निकला होगा चंद, कुमकुम एक प्यारा सा बंधन, यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. सौगंध, राजू बन गया जेंटलमॅन, खलनायक, सत्य, हे राम, लगे रहो मुन्नाभाई थ्री इडियट्स, रेडी, बर्फी, मनमर्जीया, केदारनाथ सम्राट पृथ्वीराज आणि लाल सिंह चड्ढा यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले होते.
आता त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.