‘स्वाभिमान’ मालिकेतील या दिग्गज कलाकाराने सोडली मालिका; समोर आले धक्कादायक कारण

‘स्वाभिमान’ मालिकेतील या दिग्गज कलाकाराने सोडली मालिका; समोर आले धक्कादायक कारण

स्वाभिमान मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत निहारिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. ती बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेता सुमित भुसावळे याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

नुकताच सुमित आणि दिशा यांनी 2022 अर्थात नवीन वर्षाचे स्वागत केले. सुमित आणि दिशा या दोघांनी न्यू इयर पार्टी एकत्र सेलिब्रेट केली. ‘एक असा मित्र जो माझ्या सोबत कायम असतो, असं खास कॅप्शन दिशांने लिहिलं आहे. आता दिशा आणि सुमित हे खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का? याचा उलगडा लवकरच होईल.

गेल्या काही दिवसांमध्ये मालिकांमध्ये कलाकारांची अदली बदली करण्याचे प्रकार देखील खूप वाढले आहेत. तसेच अनेक कलाकार हे मानधन चांगले मिळत नसल्याने देखील आपल्या आहे‌ त्या मालिका सोडत असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे मालिकांमध्ये नवीन कलाकार आपल्याला दिसत असतात.

गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तब्बल चार कलाकारांनी ही मालिका सोडल्याचे पाहिले असेल. या सगळ्यांचे कारण हे वेगवेगळे आहेत. मात्र, एकाच वेळेस अशा कलाकारांनी मालिका सोडल्याने याचा फटका मालिकांना बसत असतो. निर्मात्यांना ते परवडणारे नसते, तर कलाकार हे ऐकत नाहीत, असेही समोर आले आहे‌.

आता देखील स्वाभिमान मालिकेत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते मालिका सोडून गेले आहेत. त्याचे खरे कारण काही कळू शकले नाही. मात्र ते आता ही मालिका सोडणार की या मालिकेत काम करणार हे देखील सांगितले नाही. या मालिकेतील आता एका मुख्य कलाकाराने ही मालिका सोडल्याचे समजते. याबाबत सोशल मीडिया वरून माहिती समोर आली आहे‌.

या मालिकेत काम करणारे पुरुषोत्तम सूर्यवंशी यांनी ही मालिका काही कारणांनी सोडली आहे. या अभिनेत्याचे नाव प्रसाद पंडित असे आहे. प्रसाद पांडे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात आजवर काम केले आहे. आता त्यांनी मालिका सोडण्याचे कारण देखील समोर येत आहे. सोनी मराठी वरील सुंदर माझे घर या मालिकेत ते काम करणार असल्याचे कळते.

सुकन्या मोने यांच्या पतीची ते भूमिका साकारणार असल्याचे कळत आहे. तसेच स्वाभिमान आणि सुंदर माझे घर या दोन्ही मालिकात ते एकत्र काम करतील, असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी मालिका सोडली की नाही आपला येत्या काही दिवसातच कळणार आहे.

Team Hou De Viral