या मराठमोळ्या अभिनेत्याच्या लहानपणीचा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल, दिसतोय साईबाबांच्या वेशभूषेत

या मराठमोळ्या अभिनेत्याच्या लहानपणीचा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल, दिसतोय साईबाबांच्या वेशभूषेत

स्वप्निल जोशी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्वप्निलने शेअर केलेल्या फोटोत तो आपल्याला साईबाबांच्या रूपात दिसत आहे. त्याने फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी अशी वेशभूषा केली होती. स्वप्निलने सबका मालिक एक, साईबाबा असे या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे.स्वप्निलचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ काहीच तासांत 17 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. स्वप्निल जोशीने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले.

पुढे त्याने ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते.

‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला.आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाईलने स्वप्निलने तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरही स्वप्नीलने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

‘चेकमेट’, ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मितवा’, ‘मोगरा फुलला’ अशा विविध चित्रपटांमधून स्वप्निलने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral