स्वरा नाही तर ही चिमुकली गाते ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील सर्व गाणी, आहे खुपचं गोड आवाज..

स्टार प्रवाह या वाहिनीवरील गात आहे या मालिकेमध्ये आपल्याला छोटी स्वरा दिसली आहे. स्वरा ची भूमिका अतिशय जबरदस्त झालेली आहे. ही भूमिका बाल कलाकार अन्वी तायवाडे हिने साकारली आहे. स्वरा ही आठ वर्षांची असून ती म्हणून नागपूरची रहिवासी आहे.
ही मालिका 2 मे 2022 पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेमध्ये स्वरा हिला तिचे बाबा कोण असतात याची माहिती नसते. ती याचा शोध घेण्याचा प्रयत्न या मालिकेत करताना दिसणार आहे. अन्वी हिने याआधी देखील अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सोनी टीव्हीवरील एका हिंदी मालिकेत तिने काम केले होते.
त्याच प्रमाणे स्टार प्लस या वाहिनीवर तिने एका मालिकेमध्ये साचीची भूमिका साकारली होती. अन्वी हिला अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत ठेवण्यासाठी तिची आईही खूप मदत करत असते. आता अन्वी ही मराठी चित्रपटात देखील दिसणार आहे. कुलूप या चित्रपटात ती दिसली. अन्वी हिची मराठीतील ही पहिलीच मालिका आहे.
बंगाली मालिकेची ही मालिका रिमेक असल्याचे सांगण्यात येते. तुझेच मी गीत गात आहे, या मालिकेमध्ये आपल्याला उर्मिला कोठारे ही दिसणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर उर्मिला कोठारे ही आपल्याला मालिका विश्वामध्ये दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो देखील नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
या प्रोमोमध्ये अतिशय रंजक ही मालिका असल्याचे दिसत आहे, तर या मालिकेमध्ये आपल्याला अभिजित खांडकेकर हा अभिनेता देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते. उर्मिला कोठारे या मालिकेमध्ये वैदहीची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अभिजीत खांडकेकर आपल्याला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहे.
या मालिकेमध्ये स्वरा हिच्या गोड आवाजाची सगळ्यांनाच जादू लागलेली आहे. मात्र, प्रत्यक्षामध्ये अनेकांना हे माहित नाही की हे गाणे नेमके कोण म्हणते, तर स्वरा हिच्या पाठीमागे गाणे म्हणणारी बालकलाकार जी आहे तिचे नाव देखील स्वरा असेच आहे. स्वरा बनसोडे असे तिचे नाव आहे. स्वरा बनसोडे ही अतिशय जबरदस्त अशी बाल गायिका आहे.
तिने अनेक मालिका, चित्रपटासाठी देखील गाणी गायलेली आहेत. स्वरा बनसोडे ही मूळची वाशीची राहणारी आहे. आता तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेमध्ये ती स्वरा हिच्या गाण्याला आपला आवाज देत आहे, तर मूळ मालिकेत काम करणारी स्वरा केवळ आपले ओठ हलवत असते, तर आपल्याला स्वराच्याबद्दल काही सांगायचे असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.