अखेरच्या 2 मिनिटांमध्ये असं काय घडलं ? की अभिनेत्रीने गमावला जीव

अखेरच्या 2 मिनिटांमध्ये असं काय घडलं ? की अभिनेत्रीने गमावला जीव

बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकार आपल्याला सोडून गेल्याचे आपण पाहिले आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये देखील अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेले. यामध्ये महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर अवघी दक्षिणात्य चित्रपट सृष्टी ही हळहळली.

त्यानंतर आपल्याला बॉलीवूडमध्ये देखील असेच काही प्रकरण पाहायला मिळाले. बॉलीवूडमध्ये देखील अनेक कलाकार हे गेल्या काही वर्षात आपल्याला सोडून गेले आहेत. यामध्ये मग आपल्याला इरफान खान, ऋषी कपूर, श्रवण राठोड यांच्यासह लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यासारख्या कलाकारांचा समावेश करावा लागेल.

त्याचबरोबर प्रसिद्ध गायक के. के. यांचा देखील कोलकता येथील एका लाईव्ह प्रोग्राम दरम्यानच मृत्यू झाल्याची बातमी देखील काही महिन्यांपूर्वीच धडकली होती. त्यानंतर एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. याचबरोबर काही कलाकारांनी आत्महत्या देखील केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून आलेल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टी देखील शोक मग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री सुनील शेंडे यांचे देखील निधन झाले. शेंडे हे अतिशय लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडच्या जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अशा अभिनेत्री तब्बसुम यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. कारण जुन्या जमान्यातील त्या एक दिग्गज अभिनेत्री होत्या. मात्र, आता तब्बसुम यांच्या बाबतीतले सत्य त्यांच्या मुलांनी नुकतेच सांगितले आहे. तब्बसुम यांनी अरुण गोविंद यांच्या भावासोबत लग्न केले होते. तब्बसुम यांना एक मुलगा असून त्याचे नाव होशिंग गोविल असे आहे. आपल्या आईच्या निधनाबद्दल बोलताना होशिंग म्हणाला की, आम्ही खूप मजेत होतो.

आम्ही आमच्या एका शोचे चित्रीकरण देखील करत होतो. दहा दिवस या शोचे चित्रीकरण बाकी होते. मात्र, माझ्या आईला गॅस्ट्रोची समस्या निर्माण झाली होती. त्यासाठीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर हा आजार खूपच बळावला आणि माझ्या आईला शेवटच्या दोन मिनिटांमध्ये लागोपाठ दोन हृदयविकाराची झटके आले आणि यातच तिची प्राणज्योत मालवली, असे त्यांनी याबाबत बोलताना सांगितले.

माझ्या आईच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील पोकळी ही भरून निघणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमच्या दुःखाच्या काळात ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे खूप आभार मानतो, असे देखील त्याने सांगितले आहे.

Team Hou De Viral