गूढ वाढले! आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा तो व्यक्ती कोण? NCB म्हणते संबंध नाही

गूढ वाढले! आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा तो व्यक्ती कोण? NCB म्हणते संबंध नाही

गोव्याला निघालेल्या क्रूझवरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्री छापेमारी केली. यामध्ये बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सगळीकडे या ऑपरेशनची चर्चा असताना एका सेल्फीनेही सोशल मीडियावर धूम माजविली होती.

एनसीबीने कारवाई आधी त्या पार्टीमध्ये आपली माणसे पेरली होती, हा तो अधिकारी होता. ज्याने डमी म्हणून रेव्ह पार्टीत प्रवेश केला आणि भांडाफोड केली, असे बोलले जात होते. यावर एनसीबीने खुलासा केला आहे. आर्यन खानला स्पॉट करताना एका व्यक्तीने त्याच्यासोबत सेल्फी काढला होता.

हाच व्यक्ती आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर नेताना दिसत होता. यामुळे साऱ्यांनी तो एनसीबीचा अधिकारी किंवा अंडरकव्हर अधिकारी असेल असा कयास बांधला होता. परंतू एनसीबीने त्या सेल्फीमधील जो व्यक्ती आहे तो एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यामुळे हा व्यक्ती कोण होता, तिथे काय करत होता आणि आर्यन खानला नेण्यात त्याची काय भूमिका होती याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. तो जर एनसीबीचा अधिकारी नव्हता तर तो नेमका कोण होता, तो त्याच रेव्ह पार्टीत सहभागी झाला होता का, आणि त्याने संधीचा फायदा घेऊन पळ काढला का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आतापर्यंत नेमके काय झाले – मुंबई ते गोवा आणि परत मुंबई अशा क्रूझवरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने छापेमारी केली. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा सापडला आहे. त्याला अटक झाली असून त्याच्यासोबत अनेक असे लोक सापडले आहेत जे बॉलीवूड घराण्यांशी थेट संबंधीत आहेत.

हिरो, हिरोईनींची मुले, नातेवाईक यामध्ये सापडले आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या मोबाईलमधून आणखी काही कनेक्शन उघड होत असल्याचे या सूत्रांनी सांगितले आहे. दिवंगत अभिनेता सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये बॉलिवूड कनेक्शन समोर येत आहे.

चौकशीवेळी केवळ बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या मुलांचीच नावे नाहीत तर त्या आधी इतर रेव्ह पार्ट्या किंवा ड्रग प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्यांची नावेही समोर आली आहेत. सुरुवातीच्या तपासात संशयाची सुई मुंबईच नाही तर गुरुग्राम आणि दिल्लीकडे वळली आहे. या क्रूझवर पार्टीचे आयोजन करण्यामागे बटाटा गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आर्यन खानसह मुनमुन, अरबाज अशा ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

Team Hou De Viral