धक्कादायक ! दोन गोंडस मुलांना सोडून ‘हा’ अभिनेता गेला देवाघरी

धक्कादायक ! दोन गोंडस मुलांना सोडून ‘हा’ अभिनेता गेला देवाघरी

गेले काही दिवसापासून बॉलीवूड तसेच दक्षिणातील चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी आपले जीवन संपवल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. झगमगत्या दुनियामध्ये अनेकांना नैराश्य आलेले असते. यामुळेच अनेक कलाकार हे आपले आयुष्य संपवण्यासारख्या गोष्टी देखील करत असतात.

आता देखील एका कलाकाराने आपले जीवन संपवल्याची बातमी समोर आली आहे. याबद्दलच आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया. लोकेश राजेंद्र याने वयाच्या 34 वा वर्षी आत्महत्या केली आहे. लोकेश राजेंद्र यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एक उत्तम अभिनेता कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.

मात्र, आता त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. लोकेश याला दोन मुलं देखील आहे. गेल्या काही वर्षापासून त्याच्यामध्ये व त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. याच वादाला कंटाळून त्याने आपला जीव दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या वडिलांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माहिती दिली आहे.

चार दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. या सगळ्या गोष्टीमुळे तो खूप त्रस्त झाला होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. मी शुक्रवारी लोकेशला सगळ्यात शेवटच पाहिलं होतं. त्यानंतर त्याला मी पाहिलेच नाही, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या मृत्यूसाठी त्याची पत्नी कारणीभूत असल्याचा आरोप देखील त्यांनी लावला आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी त्याने पैशाची गरज असल्याचे सांगून माझ्याकडून पैसे देखील घेतले होते. मात्र पैशाची गरज कशासाठी होती हे मात्र काही कळू शकले नाही. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व चौकशी केली असता पोलिसांनी सांगितले की, वैवाहिक जीवनामुळे त्याला खूप ताण-तणाव आला होता.

या ताणतणावातूनच त्याने आपले जीवन संपवले. याप्रकरणी पोलिस आता सगळ्यांची चौकशी करत असल्याचे सांगण्यात येते. वैवाहिक आयुष्यातील ताणतणावामुळे त्याला मद्यपान करण्याची सवय लागली होती. तो रोज मद्यपान करत होता आणि यातूनच मग वाद वाढत गेले. त्यानंतर त्याने घरामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

आता एका हरहुन्नरी कलाकाराने जीवन संपवल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

Team Hou De Viral