‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील ‘तन्वी मुंडले’ ने दिली खुशखबर

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील ‘तन्वी मुंडले’ ने दिली खुशखबर

पाहिले न मी तुला ही मालिका छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. मात्र, प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही मालिका लवकरच बंद करावी लागली. या मालिकेमध्ये शशांक केतकर तन्वी मुंडले यांच्यासह इतरांच्या भूमिका होत्या.

मात्र या मालिकेला काही खास कमाल दाखवता आली नाही. गेल्या वर्षभरामध्ये अशाच अनेक मालिका या प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने बंद पडल्या आहेत. यामध्ये अनेक मालिकांचा समावेश आहे. मन झालं बाजींद ही मालिका देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने बंद होण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तर पाहिले न मी तुला या मालिकेमध्ये शशांक केतकर आपल्याला दिसला होता.

मात्र त्याला देखील काही फारशी कमाल या मालिकेमध्ये करता आली नाही. शशांक केतकर याने होणार सुन मी या घरची या मालिकेत चांगले काम केले होते. मात्र, त्याची ही मालिका चांगलीच आपटली. आता या मालिकेत काम करणारी तन्वी ही लवकरच नव्या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत.

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडले घराघरात लोकप्रिय झाली. तिला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मात्र या मलिकेला तितका उत्तम प्रतिसाद मिळत नसल्याने मालिकेने लवकरच गाशा गुंडाळला असला तरी त्या तन्वी हिची भूमिका नक्कीच प्रेक्षकांना भावली. त्यानंतर तन्वी पुन्हा कोणत्या कोणत्या प्रकारची भूमिका करते याची उत्सुकता होती.

त्याचे उत्तर आता मिळाले. तन्वी लवकरच आपल्या भेटीस येत आहे. तन्वी आता भाग्य दिले तु मला या मालिकेत दिसणार आहे. ती मालिकेतून लवकरच आपल्या भेटीस येत आहे. साडी मध्ये ती खूपच गोड दिसते. ही मालिका चार एप्रिल पासून कलर्स मराठी वर सुरू होत आहे. या मालिकेमध्ये तन्वीसोबत अभिनेता विवेक सांगळे हादेखील दिसणार आहे.

या मालिकेमध्ये तन्वी अतिशय जबरदस्त भूमिकेत आहे. प्रोमोमध्ये ती साडीवर सुंदर दिसत आहे. या मालिकेमध्ये तन्वी हिला संस्कृती जपण्याचा ध्यास आहे, तर विवेक याला आधुनिकतेची कास आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेतून या दोघांची हळूवार प्रेम कहानी आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.

या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण सुरू झाले असून त्याचे नवीन याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ तन्वी हिने शेअर केले आहेत. या नव्या मालिकेत साठी तन्वी हिला चहात्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तन्वी ही मूळची कोकणातील कुडाळ येथील रहिवासी आहे. बाबा वर्धन या नाटकाच्या ग्रुपमधून तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

तन्वी हिचे शिक्षण बीएस्सी फिजिक्स झाले आहे. असे असले तरी मराठी भाषेवरील तिचे प्रेम आहे. त्यामुळे तिने मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम करणे सोडले नाही.

Team Hou De Viral