टप्पूसोबत बाल विवाह करणारी टिना आता खरोखरच झाली आहे लग्नाच्या वयाची, पाहा कशी दिसते

टप्पूसोबत बाल विवाह करणारी टिना आता खरोखरच झाली आहे लग्नाच्या वयाची, पाहा कशी दिसते

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मंनोरंजन करताना दिसते. या मालिकेत सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतात. विशेष करून जेठालाल आणि बबिता यांच्यामधील जी काही केमिस्ट्री आहे, ती प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

जेठालालची भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे. तर बबीताची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने साकारली आहे. बबीता म्हणजे मुनमुन दत्ता हिने काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एकाला चांगलेच झोडपून काढले होते. त्याचे कारणही तसेच होते. बबीता हिला एका चाहत्याने सोशल मीडियावर एका रात्रीचे किती घेतेस, असे विचारले.

त्यानंतर तिचा पारा भडकला आणि तिने त्याला चांगलेच सुनावले. या मालिकेमध्ये चंपकलाल, भिडे गुरुजी, अंजली भाभी, तारक मेहता, रोशन सोढी, टप्पू सेना यातील सर्वच भूमिका लोकप्रिय ठरलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी आपण या मालिकेमध्ये टप्पूचा बालविवाह पाहिला असेल. टप्पू याचे लहानपणीच त्याचे आजोबा लग्न लावून देतात.

त्यानंतर ही भूमिका साकारणारी बाल अभिनेत्री कोण? याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली होती. हा एपिसोड खूप दिवस चालला होता. एकूणच या एपिसोडची चर्चा देखील त्यावेळेस मोठ्या प्रमाणात रंगली होती. आता टप्पू सेना मधील टप्पू हा बदलण्यात आलेला आहे. टप्पू आता मोठा झालेला आहे. लहानपणीचा टप्पू हा वेगळा होता.

या मालिकेत आतापर्यंत अनेक पात्र हे बदलण्यात आलेले आहेत. काही दिवसापूर्वी सोढीची भूमिका भूमिका साकारणारा अभिनेत्याने देखील ही मालिका सोडली आहे. आता त्याच्या जागी नवीन पात्र घेण्यात आले आहे. त्याचबरोबर दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिने देखील काही वर्षापूर्वी ही मालिका सोडली आहे. ती अजून या मालिकेत परतलीच नाही.

लग्न झाल्यानंतर ती गरोदर राहिली‌ त्यानंतर तिने ही मालिका सोडली. मात्र, त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. काही वर्षा पूर्वी टप्पूचे लग्न दाखल झाले होते. चाचाजी त्याचे लग्न लावून देतात. ही बातमी कळताच जेठालाल याला चांगला धक्का बसतो. मात्र, जेठालाल याचे देखील काही चालत नाही. टप्पूचे लग्न लावून देण्यात येते.

त्या वेळेस एक बाल अभिनेत्री दाखवण्यात आली होती. तिचे नाव टीना दाखवण्यात आले होते. टीना ही आता मोठी झाली असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. टीना हिचे खरे नाव नुपूर भट असे असून तिचा जन्म 11 नोव्हेंबर 1999 मध्ये झाला आहे. ती सध्या एकवीस वर्षांची आहे. सोशल मीडिया वर ती खूप फोटो देखील शेअर करत असते.

अनेकांनी तिचा फोटो वर कमेंट देखील केल्या दिलेले आहेत. लहानपणी बालविवाह केला आता खरोखरच लग्नाची झाली आहे, असे देखील अनेक चाहत्यांनी म्हटले आहे.

Seema