पिंक फ्रॉक सूटमध्ये बसलेली ‘ही’ मुलगी आज आहे तेलुगु चित्रपटातली ‘सर्वात’ सुंदर अभिनेत्री

पिंक फ्रॉक सूटमध्ये बसलेली ‘ही’ मुलगी आज आहे तेलुगु चित्रपटातली ‘सर्वात’ सुंदर अभिनेत्री

अभिनेत्री तापसी पन्नूचा जन्म 1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्ली येथे एका शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिलमोहन सिंग एक व्यावसायिका आहेत तर आई निर्मलजीत पन्नू गृहिणी आहेत. वयाच्या 8 व्या वर्षापासून तापसीने कथक आणि भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. सुमारे 8 वर्षे तिनी नृत्य प्रशिक्षण घेतले.

तापसी पन्नूने आपले शालेय शिक्षण दिल्लीतील एका सार्वजनिक शाळेतून केले. अभ्यासाबरोबरच, तापसी पन्नूला खेळ आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांमध्ये रस होता. शाळा संपल्यानंतर तापसीने गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्यूटर सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

अभियांत्रिकीनंतर तिला एमबीए करायचं होतं पण तिला आवडतं महाविद्यालय मिळालं नाही, यामुळे तिने सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करण्यास सुरवात केली. तापसीनेही जवळपास 6 महिने काम केले. अभिनयात सामील होण्यापूर्वी तापसीने पन्नू बरीच काळ मॉडेलिंग केली.

वास्तविक तिने ‘गेट गॉर्जियस पेजेन्ट’ मध्ये अर्ज केला आणि त्यामध्ये तिची निवड झाली.मॉडेलिंगच्या दुनियेनंतर तिला साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडून ऑफर येऊ लागल्या. अभिनेता धनुष यांच्यासमवेत तिने ‘आडुकलम’ या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्या चित्रपटाने एकूण 6 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.

2013 मध्ये चष्मेबद्दूर या बॉलिवूड चित्रपटामधून तापसीने डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही परंतु सर्वांनी तापसीची दखल घेतली. दिग्दर्शक शुजित सरकारच्या ‘पिंक’ या चित्रपटामधून तापसीला मोठी ओळख मिळाली. यामध्ये तिच्या भूमिकेचे प्रेक्षक तसेच समीक्षकांनीही कौतुक केले. या चित्रपटाच्या नंतर, तापसीकडे चित्रपटांची लांबलचक रांग होती.

एवढेच नव्हे तर पिंकने महिलांशी संबंधित सर्व मुद्द्यांमध्ये एक नवीन वादविवाद देखील सुरू केले. बेबी, नाम शबाना, जुडवा २, सूरमा, द गाझी अटॅक, पिंक, मनमर्जियान, बदला आणि मुल्क हे तापसीचे मुख्य चित्रपट आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

इतर बातम्या –

बॉलीवुड मधल्या ‘या’ अभिनेत्री लग्नाअगोदरच झाल्या होत्या प्रेग्नेंट, 4 नंबरच्या अभिनेत्रीच नाव ऐकून तुम्ही थक्क व्हाल

सुशांत बाबतच्या तपासाला नवं वळण; ट्विटर अकाऊंटनं वेधलं पोलिसांचं लक्ष

Team Hou De Viral