‘तारक मेहता…’ च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ह्या महत्वाच्या कलाकाराने अखेर मालिका सोडली

‘तारक मेहता…’ च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ह्या महत्वाच्या कलाकाराने अखेर मालिका सोडली

तारक मेहता का उल्टा चश्मा हा गेल्या काही वर्षांपासून एक ब्रँड झालेला आहे. ही मालिका लहानांपासून मोठ्यांना खूप आवडते. या मालिकेतील सर्व पात्र चांगले आहेत. दयाबेन, जेठालाल, चंपकलाल, पत्रकार अशा भूमिका सर्वांनाच आवडतात. त्यानंतर हाथी ही भूमिका साकारणारा कलाकार देखील सर्वांना खूप आवडतो.

गोकुळधाम सोसायटी ही सर्वत्र चर्चेचा विषय आहे. ही मालिका आजही तेवढीच चालत असते. या मालिकेमध्ये गोकुलधाम सोसायटीचे अध्यक्ष म्हणून आत्माराम तुकाराम भिडे यांनी काम केले आहे. ही भूमिका मराठमोळे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी केलेली आहे. मंदार चांदवडकर हे आधी इंजिनीयर होते.

त्यांनी काही वर्ष नोकरी देखील केलेली आहे. मात्र, अभिनयाची आवड असल्याने त्यांनी मराठी मालिका आणि चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेक मराठी आणि चित्रपटात काम केलेले आहे. त्यांच्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय देखील दिला आहे. त्यांचा जन्म 27 जुलै 1976 रोजी झालेला आहे.

मंदार हे तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सर्वांना हसवत असतात. या एका भागाच्या चित्रीकरणासाठी ते तब्बल पंचेचाळीस हजार रुपये घेत असल्याचे सांगण्यात येते. मंदार यांच्याकडे जवळपास वीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे देखील सांगण्यात येते. तसेच त्यांच्याकडे आलिशान गाड्या आणि आलिशान बंगला देखील आहे.

तर मालिकेमध्ये जेठालाल आणि तारक मेहता यांच्या भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडतात. मात्र, काही वर्षांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, तारक मेहता आणि जेठालाल यांच्यामध्ये अजिबात जमत नाही. तारक मेहता ही भूमिका अभिनेता शैलेश लोढा यांनी साकारली आहे. तर जेठालाल ही भूमिका दिलीप जोशी यांनी साकारली आहे.

दोघेही चांगले मित्र आहेत. मात्र, या दोघांमध्ये मध्यंतरी भांडण झाले होते, असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये शैलेश लोढा यांनी सांगितले होते की, आमच्यामध्ये असा काही वाद नाही. आम्ही चांगले मित्र आहोत, असे त्यांनी म्हटले होते.

आता एक बातमी समोर आली आहे की, या मालिकेमध्ये तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी तारखांच्या घोळामुळे त्यांनी ही मालिका सोडल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडे आगामी काही काळात अनेक चांगले प्रोजेक्ट देखील आहेत, असे म्हटले जात आहे.

त्यामुळे आता तारक मेहता ही भूमिका साकारताना शैलेश आपल्याला दिसणार नाहीत. मात्र, त्यांनी जर ही मालिका सोडली तर या मालिकेचा जीव जाईल, असे देखील सांगण्यात येत आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र ते ही मालिका सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Hou De Viral